नाशिक

त्र्यंबकला झळकला नगराध्यक्षांचा निषेधाचा फलक

 

त्र्यंबकेश्‍वर : प्रतिनिधी

उपनगराध्यक्षपदाच्या निवडीनंतर येथील नगरसेवकांत दोन गट पडले आहेत. त्यातून काल नगरसेवकांमधील दुहीचे जाहीर दर्शन घडले. विरोधी गटातील नगरसेवकांनी नगराध्यक्षांच्या निषेधाचा फलक झळकवत नगराध्यक्षांच्या दालनालाच कुलूप ठोकल्याने काही काळ वातावरण तंग झाले होते.

शहरात सुरू असलेल्या प्रसाद योजनेच्या कामांची पाहणी करण्यासाठी नाशिक मनपा नेते दिनकर पाटील यांना निमंत्रीत करण्यात आले होते.नगराध्यक्षांच्या लेटरहेडवर सत्तारूढ गटातील नगरसेवकांना निमंत्रण देण्यात आले होते.नगर पालिका सभागृहातील सर्व 19 सभासदांची यादी लेटरहेडवर होती.त्यापैकी शिवसेनेचे दोन सदस्य गटनेत्या मंगला आराधी, कल्पना लहांगे तसेच भाजपाचे स्वप्नील शेलार आणि शामराव गंगापुत्र यांच्या नावावर रेघ ओढत फुली मारली होती.त्यामुळे संतप्त झालेल्या शिवसेनेच्या नगरसेविका आराधी आणि लहांगे,भाजपाचे शेलार तसेच  बाळासाहेबांची शिवसेना शहर प्रमुख सुरेश गंगापुत्र,भूषण अडसरे,कुणाल उगले,अशोक लहांगे,प्रशांत बागडे आदी एकत्र आले.त्यांनी नगराध्यक्षांचा निषेध नोंदवत फलक झळकवत त्यांच्या दालनाला कुलूप ठोकले. त्यानंतर पालिका  कार्यालयाच्या पाय-यांवर ठिय्या मांडला. नगराध्यक्ष पुरूषोत्तम लोहगावकर,उपनगराध्यक्षा त्रिवेणी तुंगार,आरोग्य सभापती सागर उजे,नगरसेवक कैलास चोथे,विष्णु दोबाडे तेथे उपस्थित झाल्यानंतर आमच्या नावापुढे फुली का मारली, याचा जाब लहांगे, आराधी आणि शेलार यांनी विचारला.नगराध्यक्ष लोहगावकर यांनी हा भाजपा नेते दिनकर पाटील यांचा पाहणी दौरा होता.तो नगर पालिकेचा कार्यक्रम नव्हता असे सांगीतले मात्र आंदोलन करणा-या नगरसेवकांचे व त्यांच्या समर्थकांचे समाधान झाले नाही.दरम्यान याची माहीती पोलीस ठाण्याकडे कळवण्यात आली.काही वेळात तेथे पोलीस पोहचले आणि त्यांनी तो फलक हटवला.

दोन महिन्यांपूर्वी झालेली उपनगराध्यक्षांची निवडणूक यास कारणीभूत ठरली असून तेव्हा पासून नगरसेवकांमध्ये दोन गट पडले आहेत.भाजपाचे थेट नगराध्यक्ष आणि 14 सदस्य,शिवसेनेचे 2,अपक्ष 1 आणि भाजपाचे स्विकृत 2 असे सभागृहात बलाबल आहे.मात्र आता भाजपात दोन गट पडले आहेत.त्यांनी शिवसेनेच्या दोन सदस्यांच्या बाजूने उभे राहत नगराध्यक्षांच्या कारभारावर पक्षपाती कारभाराचा आरोप केला आहे.

 

 

 

Ashvini Pande

अश्विनी पांडे या 2019 पासून पत्रकारितेत कार्यरत असून, सध्या दैनिक गांवकरीत ऑनलाइन कंटेंट क्रीएटर तसेच उपसंपादक म्हणून कार्यरत आहे. त्यांना राजकीय व सामाजिक, सांस्कृतिक विषयाचे सखोल ज्ञान असून, साहित्य संमेलन, राजकीय सभा, राजकारणातील घडामोडी या विषयावर त्यांनी विपुल लेखन केलेलं आहे. विज्ञान शाखे बरोबरच पत्रकारितेतील पदवी बरोबरच साहित्यातील पदव्यूत्तर पदवी त्यांनी प्राप्त केलेली आहे.पत्रकारितेतील योगदानाबद्दल त्यांना विविध सन्मानही प्राप्त झालेले आहेत.

Recent Posts

जरांगेंचा ऑडिओ ‘बॉम्ब’

राजकीय वर्तुळात खळबळ; भाजपकडून एसआयटी चौकशीची मागणी मुंबई : प्रतिनिधी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे…

2 days ago

हिरवा रंग नवरात्रीचा अन् निसर्गाचा

- विष्णू वाघ नवरात्रोत्सवात नऊ दिवस नऊ रंगाच्या सुहासिनी साड्या परीधान करतात, पुरातन काळात अशी…

3 days ago

स्टेट्स माझं, गैरसमज तुमचे!

- अफजल पठाण शब्द टाकले मी सहज, कुणाला टोचण्यासाठी नव्हते, पण काहींच्या मनाला लागले, जणू…

3 days ago

तारीख पे तारीख

- अ‍ॅड.एन.एम. राठोड न्याय म्हणजे केवळ न्यायालयाने दिलेला निकाल नव्हे, तर अन्याय सहन करणार्‍या व्यक्तीला…

3 days ago

लगबग दिवाळीची

- योगिनी पैठणकर आमच्याकडे महालक्ष्मी आल्या की घर जरा हलू, फिरू, डोलू लागते! सगळे पसारे,…

3 days ago

रेणुकादेवी घाटाच्या पायथ्याशी आयशरची ट्रकला जोरदार धडक

चालक केबिनमध्ये अडकला; दोन्ही पाय फ्रॅक्चर चांदवड : वार्ताहर मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील श्री रेणुकादेवी घाटाच्या…

3 days ago