मुंबई: संतूर वादनाला अढळ स्थान प्राप्त करून देणारे जेष्ठ संतूर वादक पंडीत शिवकुमार शर्मा यांचे निधन झाले. ते 84 वर्षाचे होते.आज त्यांना हृदय विकाराचा धक्का आला. त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. संतूर वादनाला त्यांनी जगभरात ओळख निर्माण करून दिली.
पंडित शिवकुमार शर्मा यांनी बासरीवादक हरिप्रसाद चौरासिया यांच्यासोबत मिळवून अनेक चित्रपटांना संगीत दिले. त्यात ‘सिलसिला’, ‘फासले’, ‘चांदणी’, ‘लम्हे’, ‘डर’ आदी हिट चित्रपटांचा समावेश आहे. पंडित शिवकुमार शर्मा यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार, भारताचा तिसरा सर्वोच्च नागरी सन्मान ‘पद्मभूषण’ आणि चौथा सर्वोच्च नागरी सन्मान ‘पद्मश्री’ पुरस्कार सुद्धा प्रदान करण्यात आला होता. पं. शिवकुमार शर्मा यांच्यामागे पत्नी मनोरमा आणि पुत्र राहुल शर्मा असा परिवार आहें.. काश्मीरमधील ‘संतूर’ या लोकवाद्याला अभिजात संगीताचा दर्जा देण्यात पंडित शिवकुमार शर्मा यांनी मोलाची भूमिका निभावली होती
सिन्नर येथे चार लाख बेचाळीस हजार नऊशे स्क्वेअर फुटात साकारले अजित दादा पवार यांचे फार्म…
पथकाला पाहताच लाचखोर हवालदाराची धूम नाशिक : प्रतिनिधी घोटी पोलिस ठाण्यातील हवालदार राजाराम रुंजा डगळे…
मोखाडा पोलिसांनी पाठलाग करुन पकडली अफूनी भरलेली क्रेटा कार 15 लाखांचा मुद्देमाल जप्त मोखाडा :…
नाशिक: प्रतिनिधी मी ऑनलाइन रमी खेळत नव्हतो, मला खेळता पण येत नाही. मी वेडे वाकडे…
जामीनावर सुटला आणि विनयभंग केलेल्या मुलींच्या दारातच फटाके वाजवून नाच नाच नाचला शहापूर: साजिद शेख…
ऑनलाइन गेमच्या व्यसनापायी वैद्यकीय शिक्षण सोडून बनला चोर शहापूर: साजिद शेख ऑनलाईन मोबाइल गेमच्या आहारी…