पानेवाडीत इंधन चोरीचे रॅकेट उघड

रेल्वे कर्मचारीच सहभागी, सर्वत्र खळबळ
मनमाड: नरहरी उंबरे
इंधन कंपन्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या पानेवाडी शिवारात असलेल्या आव्हाड वस्ती येथील एका घरातून चाळीस लिटर डिझेल आणि 75 लिटर पेट्रोल रेल्वे सुरक्षा बल पथकाने जप्त केले. याप्रकरणी रेल्वे कर्मचारी आणि अन्य एकास ताब्यात घेतले आहे. रेल्वे कर्मचाऱ्याचा यात सहभाग असल्याने इंधन चोरीचे मोठे रॅकेट येथे सक्रिय असल्याची शक्यता व्यक्त होत आहे.
पाने वाडी येथून संपूर्ण देशभरात इंधन पूरवठा केला जातो. या कंपन्यांच्या प्रकल्पज्वल रेलवे वॅगन भरण्यासाठी रेल्वेचे स्वतंत्र टर्मिनल आहे इंधनाची वॅगन रिकामी झाल्यानंतर तळाला शिलक राहिलेले इंधन कॅन मध्ये भरून ते बाहेर विकले जात होते. अशी गुप्त माहिती मनमाड रेल्वे सुरक्षा बलच्या पथकाला समजली होती. त्यानुसार काल सापळा रचण्यात आला. या सापळ्यात विजय दशरथ सांगळे आणि विठ्ठल रामचंद्र सांगळे हे दोघे अडकले. विशेष म्हणजे विठ्ठल सांगळे हा रेलवे कर्मचारी च या रॅकेट मध्ये सहभागी असल्याने कुंपनच शेत खात होते. पोलिसानी दोघांना अटक करण्यात आली आहे. सहायक आयुक्त बी पी कुशवाह यांच्या नेतृत्वाखाली प्रभारी अधिकारी डी के मिश्रा, उपनिरीक्षक आर, एस यादव, सागर वर्मा, मनीष कुमार यांनी ही कारवाई केली,

संगनमताने डल्ला

पाने वाडी येथील इंधन कंपन्यांच्या साठवणूक केंद्रातून दररोज रेल्वे वॅगन द्वारा तीन ते चार रॅक ठीक ठिकाणी पाठवले जातात या वगन मधून हे इंधन चोरी होत होते रेल्वे वॅगन चे व्हॉल्व उघडून त्यातून संगनमताने इंधनावर डल्ला मारण्याचे काम गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे त्यामुळे या दोघांना अटक झाल्यानंतर आता यातून मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता निर्माण झाली आहे,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *