लासलगाव विंचूरसह सोळागाव योजनेच्या माध्यमातून नागरिकांना शुद्ध पाणी पुरवठा

लासलगाव: प्रतिनिधी

नांदूरमध्यमेश्वर धरणातून मोठ्या प्रमाणात होत असलेल्या पाण्याचा विसर्ग त्यामुळे गाळयुक्त पाण्यामुळे लासलगाव विंचूरसह सोळागाव पाणी पुरवठा योजनेतून काही अंशी गढूळ पाणी पुरवठा होत होता.मात्र आता पाण्यातील गाळाचे प्रमाण कमी झाल्याने पुन्हा शुद्ध पाण्याचा पुरवठा सुरू आहे. तसेच सोळागाव पाणी योजनेची पाईपलाईन अधिक जुनी झाल्याने लीकेजचे प्रमाण अधिक असून नियमित पाणी पुरवठा करण्यास अडथळा निर्माण होत आहे.या परिस्थितीची जाणीव असतांना देखील राजकीय हेतूने नागरिकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न काही लोकांकडून केला जात असून त्यांनी नागरिकांची दिशाभूल करू नये असे आवाहन सोळागाव पाणी पुरवठा योजनेचे अध्यक्ष सरपंच जयदत्त होळकर यांनी केले आहे.

याबाबत जयदत्त होळकर यांनी काढलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की,लासलगाव विंचूरसह सोळागाव पाणी पुरवठा योजनेची पाईप लाईन अधिक जुनी झाल्याने अनेक ठिकाणी लिकेजचा प्रश्न आहे.लिकेज तात्पुरती दुरुस्तीची कामे सुरू असून योजना सुरळीत चालू ठेवण्यासाठी अविरत प्रयत्न सुरू आहे.मात्र काही ठिकाणी शेतकऱ्यांचे पीक असल्याने पाईप लाईन दुरुस्त करण्यास अडचणी येत आहे.तरी देखील शेतकऱ्यांचे सहकार्य घेऊन लिकेजची कामे पूर्ण करण्यात येऊन पाणी पुरवठा सुरळीत करण्यात येत आहे. तसेच नांदूरमध्यमेश्वर धरणातून पाणी पुरवठा सुरळीत होण्यासाठी एक गेट बंद करण्यात आले होते. त्यामुळे त्यातून सुरुवातीला गढूळ पाणी येत होते. यावेळी हे गढूळ पाणी नागरिकांनी काही दिवस पिण्यासाठी वापरू नये ते इतर कामांसाठी वापरावे अशी दवंडी देखील देण्यात आलेली होती. मात्र आता गाळयुक्त पाण्याचे प्रमाण कमी झाले असून नागरिकांना शुद्ध स्वरूपात पाणी पुरवठा करण्यात येत असल्याचे होळकर यांनी म्हटले आहे.

त्यांनी म्हटले आहे की, योजनेची पाईप लाईन अधिक जुनी असल्याने सोळागाव पाणी पुरवठा योजनेचे पूर्ण नूतनीकरण तसेच विजेचा खर्च कमी करण्यासाठी सौर ऊर्जा प्रकल्प निर्माण करण्यास माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून योजनेस २० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या योजनेची टेंडर प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. मात्र नवीन सरकार स्थापन होऊन मंत्री मंडळाचा विस्तार रखडल्याने हे काम अद्याप सुरू होऊ शकले नाही. त्यामुळे या योजनेचे काम पुढील महिनाभरात सुरू होईल असे जयदत्त होळकर यांनी म्हटले आहे. तसेच सोळागाव पाणी पुरवठा योजनेच्या नूतनीकरणाचे काम पूर्ण होईपर्यंत काही अडचणींचा सामना करावा लागणार आहे. यासाठी नागरिकांचे देखील सहकार्य अपेक्षित असून राजकीय हेतूने प्रेरित होऊन इतरांनी देखील नागरिकांच्या भावनांशी खेळु नये असे आवाहन जयदत्त होळकर यांनी केले आहे.

अधिकाऱ्यासमवेत पाहणी

लासलगाव विंचूरसह सोळागाव पाणी पुरवठा योजनेचा पाणी पुरवठा सुरळीत राहण्यासाठी पाईप लाईन दुरुस्तीचे काम युद्ध पातळीवर कामकाज सुरू आहे.या कामाची अधिकाऱ्यासमवेत पाहणी करण्यात आली.यावेळी ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता पुरुषोत्तम भांडेकर, सोळा गाव पाणी पुरवठा योजनेचे अध्यक्ष सरपंच जयदत्त होळकर, जिल्हा परिषद पाणी गुणवत्ता तज्ञ जयश्री बैरागी, गटविकास अधिकारी संदिप कराड , विस्तार अधिकारी सुधाकर सोनवणे,निफाड ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे श्री मिस्त्री, शाखा अभियंता श्री बिन्नर, ग्रामविकास अधिकारी शरद पाटील जी.टी.खैरणार यांच्यासह अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.

Bhagwat Udavant

Recent Posts

संडे अँकर : तेच गद्दार, तेच हिंदुत्व, तीच टीका, तीच भूमिका

  संडे अँकर तेच गद्दार, तेच हिंदुत्व, तीच टीका, तीच भूमिका महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत झालेल्या…

1 hour ago

घिबली अ‍ॅपची कमाल; मशालच्या जागी कमळ!

घिबली अ‍ॅपची कमाल मशालच्या जागी कमळ! मनमाड : आमिन शेख सध्याचा जमाना डिजिटलचा आहे. दररोज…

1 day ago

नियोजित वधुचे अफेअर उघड, विवाहापूर्वीच आयकर अधिकारी असलेल्या वराने संपविले जीवन

नियोजित वधुचे अफेअर उघड विवाहापूर्वीच आयकर अधिकारी असलेल्या वराने संपविले जीवन नाशिक : प्रतिनिधी नियोजित…

2 days ago

लासलगाव येथे पटेल सॉ मिलला आग

लासलगाव येथे पटेल सॉ मिलला आग श्री सिद्ध वीर हनुमान मित्र मंडळाच्या अग्निशमन टँकर मुळे…

3 days ago

नाशिकरोडला डॉ. आंबेडकर यांची जयंती उत्साहात

भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती अमाप उत्साहाने नाशिकरोड ः वार्ताहर…

4 days ago

सिन्नर तालुक्यात अपात्र शिधापत्रिका शोध मोहीम

शिधापत्रिकांची होणार तपासणी सिन्नर  प्रतिनिधी तालुक्यात तहसिल कार्यालयातील पुरवठा विभागामार्फत बोगस व अपात्र शिधापत्रिका शोध…

4 days ago