शहरात पाण्याची गरज वाढली
दररोज 5 दक्षलक्ष लिटर पाण्याची वाढ
नाशिक : प्रतिनिधी मागील वर्षी मुबलक प्रमाणात झालेल्या पर्जन्यवृष्टीमुळे नाशिककरांवरचे पाणीसंकट टळले . शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणाला यंदा मराठवाड्याला पाणी सोडण्याची वेळ आली नाही . दरम्यान , गेल्या महिन्याभरापासून पडत असलेल्या कडाक्याच्या उष्णतेमुळे शहरात पाण्याची मागणी वाढली आहे . त्यानुसार पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून नियोजन करण्यात आले असून , दररोज ५ दशलक्ष लिटर पाणी वाढवण्यात आले आहे . पाण्याची वाढ केल्यामुळे नाशिककरांना पाणीटंचाईच्या समस्येला अद्यापपावेतो तरी तोंड देण्याची वेळ आलेली नाही . वाढत्या उष्णतेमुळे नागरिकांकडून पाण्याची मागणी वाढल्याने त्यादृष्टीने पाण्याचे नियोजन केले आहे . त्यामुळे नागरिकांना पाणीटंचाईतून सुटका होणार आहे . शिवाजीनगर फिल्ट्रेशन प्लांट येथून १२० दशलक्ष लिटर पाणी उचलण्यात येत होते . आता मात्र ४ दशलश लिटर म्हणजेच ४० लाख लिटर पाणी वाढविण्यात आले आहे . तर मुकणे धरणातून १३२ ऐवजी १३३ दशलक्ष लिटर म्हणजेच दररोज १० लाख लिटर पाणी वाढविण्यात आले आहे . उन्हाळा सुरू झाला की , दरवर्षी पाण्याची मागणी वाढते . धरणसाठ्यातील पाणी लक्षात घेता महापिालकेकडून न पाण्याचे नियोजन करून त्या प्रमाणात पाणीपुरवठा करण्यात येतो . गतवर्षी समाधानकारक पाऊस पडल्याने शहराला करण्यात येणाऱ्या पाणीपुरवठ्यात गंगापूर व मुकणे धरणात पाणीसाठा मुबलक प्रमाणात असल्याने यंदाचे पाणीकपातीचे संकट टळले आहे . आजवर पाण्यासाठी नाशिक विरुद्ध मराठवाडा असा सामना रंगताना दिसला आहे . मात्र , मागील दोन वर्षांपासून पर्जन्यमान चांगले होत असल्याने गंगापूर धरणातून पाणी सोडण्याची वेळ आलेली नाही . दरम्यान , शहरात वाढत्या उष्णतेमुळे ठिकठिकाणी पाण्याची मागणी वाढली असून , नागरिकांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे हे महापालिकेचे कर्तव्य आहे .. वाढत्या मागणीप्रमाणे मनपाने शहरात ५० लाख लिटर पाण्यात वाढ केली आहे .
घरात घुसला, अंगावर पेट्रोल टाकून पेटवले अन नंतर केले असे काही... नाशिक: …
काँग्रेस मेळावा नाशिक : प्रतिनिधी वक्फ सुधारणा विधेयक पास करून जमीन ताब्यात घेण्याचा भाजपा…
कळवण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अभोणा उपबाजारात शेतकर्यांंनी गुरूवारी सुमारे 700 ट्रँक्टर मधून 15 हजार…
नाशिक : प्रतिनिधी गेल्या तीन चार महिन्यांपासून हा तिकडे चालला तो तिकडे चालला अशा अफवा…
नाशिक : प्रतिनिधी विधानसभा निवडणुकीच्या पाठोपाठ मतदार नोंदणी कार्यक्रम जाहीर केला होता.आगामी स्तानिक स्वराज संस्थेच्या…
नाशिक : प्रतिनिधी वक्फ सुधारणा विधेयक पास करून जमीन ताब्यात घेण्याचा भाजपा सरकारचा प्रयत्न असला…