पत्रावरुन अधिक चर्चेत आलेले पोलिस आयुक्त
भारतीय पोलिस सेवा आणि भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा विषय नेहमीच चर्चेत असतो. साधारणत: एकाच ठिकाणी तीन वर्षे सेवा केल्यानंतर बदली होत असते. मात्र, काही अधिकाऱ्यांच्या बदल्या तीन वर्षे पूर्ण होण्याच्या आतच होत असतात, तर काहींना मुदतीपूर्वी बदली हवी असते. विश्वास नांगरे पाटील यांची दीड वर्षांतच नाशिकच्या पोलिस आयुक्तपदावरून बदली झाली. त्यांच्या जागी आलेले दीपक पांडेय् दीड वर्षानंतर बदली हवी आहे. नाशिकचे पोलिस आयुक्त नेहमीच चर्चेत असतात. दीपक पांडेय् हेही अनेक कारणांनी चर्चेत आले. त्यातील अलीकडचे सर्वांत मोठे कारण म्हणजे त्यांनी पोलिस महासंचालकांना लिहिलेले पत्र.
पोलिस महासंचालकांना लिहिलेल्या पत्रात त्यांनी भूमाफिया आणि महसूल अधिकारी सामान्य माणसांच्या जमिनी हडप करत असल्याचा मुद्दा मांडला. त्यावर बरीच चर्चा झाली आहे. शहरीकरण, औद्योगिकीकरण आणि आधुनिकीकरण झालेल्या जिल्ह्यांमध्ये भूमाफियांची टोळी कार्यरत असून, सामान्य माणसांच्या जमिनी वाचविण्यासाठी महानगरपालिका, महानगर प्रदेश विकास प्राधिकरण किंवा महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळ असलेल्या ठिकाणी कार्यकारी दंडाधिकारी यांचे काढून घेण्याची मागणी त्यांनी केली. त्याचप्रमाणे संपूर्ण नाशिक जिल्हा पोलिस आयुक्तालयात समाविष्ट करावा, अशीही मागणी केली. नाशिक जिल्ह्यात महसूल अधिकार्यांना हाताशी धरुन भूमाफिया जमिनी कशा पध्दतीने हडप करत आहेत, याची उदाहरणेही पांडेय् यांनी दिली आहेत. त्यांनी पत्रात दिलेली उदाहरणे आणि मांडलेली भूमिका काही अंशी बरोबर आहे. मात्र त्यांनी लिहिलेले पत्र मीडियापर्यंत पोहोचल्याने आयुक्त चर्चेत आले आहेत.
महसूलची प्रतिमा मलीन
आयुक्त पांडेय् एकीकडे स्वत:च्या बदलीसाठी अर्ज करतात आणि दुसरीकडे महसूल अधिकारी आणि भूमाफिया यांचे संबंधही उघडकीस आणतात आणि नाशिक जिल्हा पोलिस आयुक्तालयात आणण्याची मागणी पत्राद्वारे करतात. यातून त्यांचा एकूणच उद्देश समजणे अनाकलनीय आहे. त्यानी लिहिलेले पत्र गोपनीय राहिले असते किंवा ते मीडियापर्यंत गेले नसते, तर त्यांच्या मागणीचा विचार महाराष्ट्र राज्य सरकारने केला असता. पत्राची जाहीर वाच्यता झाल्याने सरकारची विशेषतः महसूल विभागाची प्रतिमा एक प्रकारे मलीन झाल्याने महसूल कर्मचारी नाराज झाले आणि त्यांनी माफीची मागणी केली. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केली. राज्य सरकारने त्यांच्यावर कारणे दाखवा नोटीसही बजावल्याचे समजते. या प्रकरणावरुन पांडेय् यांनी दिलगिरी व्यक्त केली असली, ते आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. प्रशासकीय यंत्रणेत सुधारणा व्हावी, हीच त्यांची भूमिका आहे.
महसूल आणि पोलिसांविषयी नाराजी
महसूल खात्यातील काही अधिकारी आणि कर्मचारी यांचे भूमाफियांशी संबंध आहेत, हेच त्यांनी दाखल गुन्ह्याच्या आधारे सिध्द करण्याचा प्रयत्न केला. त्यांचे म्हणणे एकवेळ मान्य केले, तरी त्यांचे पोलिस खाते अत्यंत स्वच्छ आणि पारदर्शक काम करते, अशातलाही काही भाग नाही. ‘सरकारी काम आणि सहा महिने थांब’ याचा अनुभव सामान्य नागरिकांना येतच असतो आणि दुसरीकडे पोलिसांविषयी सामान्य नागरिक चांगले बोलतातच असेही नाही. पोलिस विभागातही भ्रष्टाचार आहे आणि पोलिस नागरिकांना कशी ट्रीटमेंट देतात, हेही सर्वश्रुत आहे. आपल्या पायाखाली (पोलिस विभाग) काहीतरी जळत असल्याचे आयुक्तांनी लक्षात घेतले पाहिजे.
पत्रकारांशी मैत्री
आयुक्तांनी लिहिलेले पत्र बाहेर कसे आले, याची विभागीय चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले असले, तरी पत्र बाहेर पडल्याची नैतिक जबाबदारी आयुक्त या नात्याने पांडेय् यांनी घेतली पाहिजे. पांडेसाहेब ‘क्लीन चीट’ आहेत. त्यामुळे त्यांच्याविषयी नकारात्मक चर्चा नव्हती. मात्र पत्रामुळे महसूल विभाग आणि सरकारमध्ये त्यांच्याविषयी नकारात्मकता दिसून येत आहे. नाशिकमध्ये दाखल झाले तेव्हा पांडेय् यांनी पहाटे सूत्रे हाती घेतली, तेव्हा मीडियाचे प्रतिनिधी उपस्थित नव्हते. मीडियापासून दूर राहण्याचे संकेतच पांडे यांनी नाशिकमध्ये पाऊल ठेवल्यानंतर दिले होते. नंतर त्यांनी आपल्या खास खास शैलीने पत्रकारांशी जवळीक निर्माण केली. अनेक पत्रकारांशी त्यांनी मैत्री करुन त्यांच्या सु़खदु:खात ते सहभागी होऊ लागले. याच पत्रकारापर्यंत कशी पोहचली, हा चौकशीचा भाग होऊ शकतो काय?
पुढे काय होणार?
सामान्य लोकांमध्ये पांडेय् यांची प्रतिमा चांगली आहे. हेल्मेवरुन पेट्रोल पंपचालक नाराज आहेत. महसूल कर्मचारी नाराज आहेत. उत्सवी मंडळींची परवानगीवरुन नाराजी वाढतच आहे. राज्य सरकारची मर्जी राहिलेली नाही. त्यामुळे दीपक पांडेय् यांना नाशिकमधून लवकरच हलविले जाणार असल्याचे संकेत आहेत. अर्थात त्यांना बदली हवी आहे. परंतु, मनाप्रमाणे त्यांची बदली होईल की नाही? हे काही सांगता येत नाही. उत्तम काम करणारे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांची बदली झाली. नाशिक महानगरपालिका आयुक्त कैलास जाधव यांची बदली झाली. आता पांडेय् यांचीही बदली होण्याची चिन्हे आहेत. जिल्हा पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांच्या बदलीचा विषय गाजला होता. त्यांची बदली रद्द झाली होती. परंतु, त्यांचीही बदली केली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.
गाडीत पैसे असल्याच्या संशयावरून राडा साकोरा येथे गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांकडून सौम्य लाठी चार्ज नांदगांव /…
नाशिक : प्रतिनिधी नाशिक मध्यचे दोन्ही उमेदवार देवयानी फरांदे आणि वसंत गीते एकाच वेळी आल्याने…
नांदगाव: येथील मतदार संघात आज समीर भुजबळ आणि सुहास कांदे यांच्यात आज पुन्हा राडा झाला.…
नाशिक: लोकशाहीचा उत्सव असलेल्या मतदानास सकाळी 7 वाजेपासून सुरुवात झाली आहे, मतदानाचा हक्क बजावत अनेकांनी…
जिल्ह्यात पहिल्या दोन तासात ६. ८९ टक्के मतदान नाशिक मध्य मध्ये दोन तासात सर्वाधिक…
निफाड:- प्रतिनिधी निफाड विधानसभा मतदारसंघातील शिवसेना उ बा ठा चे उमेदवार माजी आमदार अनिल कदम…
View Comments