नाशिक : प्रतिनिधी
लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत अहिवंतवाडी ता. दिंडोरी येथील पौर्णिमा गावित हिने आदिवासी मुलींमध्ये राज्यात प्रथम क्रमांक पटकावला.
सप्तशृंगगडाच्या पायथ्याशी असलेल्या अहिवंतवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक विठोबा गावित यांची ती कन्या आहे. नवोदय विद्यालयात शिकल्यानंतर राहुरी कृषी विद्यापीठात बीएससी ऍग्री पदवी मिळविली. त्यानंतर आयआयटी खरपूर येथे एमएस्सी ऍग्री पदवी मिळविली. तीन वेळा परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर मंत्रालयात कक्ष अधिकारी म्हणून निवड झाली होती. मात्र,तिने ती नाकारून प्रयत्न सुरू ठेवले. तिसर्या प्रयत्नात आता तिची महापालिकेच्या मुख्य अधिकारी म्हणून निवड झाली. आदिवासी समाजाच्या मुलींमध्ये तिने आदर्श निर्माण केला आहे.