नाशिक

धनशक्ती विरोधात जनशक्ती जिंकणार : खा. शिंदे

प्रभाग 6 चा विकास शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस (अ.प.) पुरस्कृत उमेदवार करणार

पंचवटी : प्रतिनिधी
प्रभाग क्रमांक सहामध्ये शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेेस अजित पवार गट पुरस्कृत उमेदवार असलेले अ- इंदुमती भोये- खोसकर, ब- दामोदरअण्णा मानकर, क- सुनीता पिंगळे, ड- प्रमोद पालवे यांना मतदारांचा पाठिंबा मिळत आहे. त्यांच्या माध्यमातून यावेळी प्रभागावर शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकणार आहे. जनशक्ती धनशक्तीला जागा दाखवणार असल्याचा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला आहे.

प्रभाग क्रमांक सहामध्ये यावेळी शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि भाजप यांच्यात खर्‍या अर्थाने लढत होणार आहे. शिवसेना (शिंदे गट)-राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या पॅनलमध्ये आमदार हिरामण खोसकर यांची कन्या इंदुमती भोये-खोसकर, माजी नगरसेवक दामोदरअण्णा मानकर, माजी नगरसेविका सुनीता पिंगळे आणि जिजाई फाउंडेशनचे संस्थापक प्रमोद पालवे यांच्यासारखे अनुभवी उमेदवार आहेत. त्यातच दामोदर मानकर यांनी अपक्ष नगरसेवक असताना 100 कोटींच्या वर कामे केलेली आहेत. मनपा शाळा क्रमांक 86/87 या शाळेची इमारत आणि पाणीप्रश्न, तसेच महत्त्वाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले आहेत.
आमदार हिरामण खोसकर यांची कन्या इंदुमती भोये (खोसकर) यांनी जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम केल्याचा अनुभव आहे. वडील आमदार असल्याने त्यांचाही फायदा या प्रभागासाठी होणार आहे. माजी नगरसेविका सुनीता पिंगळे यांना भाजपने अखेरपर्यंत तिकीट देतो म्हणून झुंजवत ठेवले.अखेरच्या क्षणी इतरांना तिकीट दिल्याने मतदारांमध्ये त्याचा रोष असल्याने त्याचाही फायदा या निवडणुकीत होणार आहे. जिजाई फाउंंडेशनचे संस्थापक प्रमोद पालवे यांचे बंधू बाळासाहेब पालवे अनेक वर्षे मखमलाबाद सोसायटीचे संचालक आणि सभापती राहिले आहेत. त्यामुळे सर्वांशी जनसंपर्क आहे. प्रमोद पालवे कुठल्याही पक्षाचे सदस्य नसताना गेली आठ वर्षे सामाजिक कार्यात सक्रिय असल्याने ते घराघरांत पोहोचले आहेत. कोविड काळात त्यांनी अनेकांना सर्वच प्रकारचा आधार दिला होता.त्यामुळे मखमलाबाद गाव परिसर आणि प्रभागातील हनुमानवाडी, रामवाडी आदी परिसराचा विकास हेच उमेदवार करू शकणार आहेत.विरोधकांकडे केवळ धनशक्ती आहे; परंतु आमच्याकडे जनशक्ती असल्याने जनता आमच्या पाठशी ठाम उभी राहिली असल्याचे अ- इंदुमती भोये (खोसकर), ब- दामोदरअण्णा मानकर, क- सुनीता पिंगळे, ड- प्रमोद पालवे यांनी सांगितले.

People’s power will win against wealth: Kha. Shinde

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

16 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

16 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

16 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

16 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

16 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

16 hours ago