नाशिक

परफेक्ट लूक इज बिअर्ड लूक!

युवकांमध्ये वाढती क्रेझ;
नाशिक : प्रतिनिधी
दाढी ही पुरूषत्व दाखवणारे लक्षण आहे. गल्लीपासून दिल्लीपर्यंत सध्या दाढीवाल्यांची क्रेझ आहे. त्यामुळेच युवकांमध्ये दाढी ठेवण्याची क्रेझ वाढत आहेत. राजकारण, क्रीडा, कला, साहित्यसह  क्षेत्रात दाढी ठेवणारे पुरूष दिसतात. सर्वच क्षेत्रात आघाडीवर असलेल्या पुरूषांमध्ये  खास लक्षण सध्या दिसत आहे ते म्हणजे त्यांची भरगच्च अशी रूबाबदार दाढी. राजकारणात  पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, किक्रेटर विराट कोहली, रविंद्र जडेजा , यासह पुष्पामधील अभिनेता अल्लु अर्जनच्या लूकचा प्रेक्षकांना प्रंचड भावला होता. अभिनेता विजय देवरकोंडाच्या बिअर्डची लूकची युवकांमध्ये क्रेझ आहे.परिणामी युवक दाढी ठेवण्यास प्राधान्य  देत आहेत. साहित्यिक ,विचारवंत तर दाढी वाढवतातच पण हल्ली  तरूण दाढी वाढवताना दिसत आहेत. पूर्वी क्लिन शेव्ह म्हणजे सभ्यपणा असे मानले जात होते. पण हल्ली बिअर्ड लूकला पसंती देत ऑफिशियल लूक मानण्यात येत आहे.   त्यामुळे ऑफिस असो वा कॉलेज, कॉर्पोरेट सेक्टर असो सर्वच ठिकाणी बिअर्ड लूक वाले तरूण , पुरूष दिसत आहेत.
दाढी हे सध्या स्टाईल स्टेटमेंट झाले आहे. त्यामुळे भरगच्च अशी दाढी असणारा युवक हा रूबाबदार वाटत असल्याने तरूणांचा कल दाढी ठेवण्याकडे आहे. दाढीचे प्रकारही विविध आहेत. त्यात लॉग स्टबल, शॉर्ट स्टबल,मीडियम स्टबल, फुल बिअर्ड, गॅरीबाल्डी, इम्पिरीयल, सर्कल बिअर्ड,बॅनडोल्ज  प्रकारची दाढी ठेवण्यात येते. कलाकार तर नेहमीच वेगवेगळ्या प्रकारची दाढी ठेवत असतात. पुरूषांना दाढी ठेवल्यानंतर शक्यतो चेहर्‍याची विशेष अशी काळजी घ्यावी लागत नाही. मात्र दाढीचा लूक अपडेट दिसण्यासाठी पुरूष सलूनला जास्त प्रमाणात जात आहे. दाढीमुळे सहज रावडी लूक येतो. त्यामुळे हल्ली तरूणांचा कल दाढी ठेवण्याकडे आहे.

बिअर्ड लूक मेटेंनसाठी खर्च
दाढी वाढवणे हे सहज शक्य असले तरी  दाढीचा लूक स्टाईल स्टेंटमेंटमध्ये बदलण्यासाठी तरूणांना दाढीची विशेष काळजी घेत त्यासाठी सलूनला जात पैसे खर्च केले जात आहेत.
सण, समारंभ, लग्न , प्री.वेडिंग किंवा पार्टी काहीही असो तरूणांकडून बिअर्ड लूकला पसंती देण्यात येत आहे. त्यामुळे तरूणांकडून सध्या परफेक्ट लूक इज बिअर्ड लूक असे मानण्यात येत आहे.

Ashvini Pande

Recent Posts

मुलींचा सांभाळ करण्याचा कंटाळा आल्याने  आईने उचलले भयानक पाऊल

  मुलींचा सांभाळ करण्याचा कंटाळा आल्याने  आईने उचलले भयानक पाऊल शहापूर : साजिद शेख शहापूर…

4 hours ago

ट्रॅपची माहिती होती, तर सतर्क का केले नाही?

मंत्री गिरीश महाजन यांचा एकनाथ खडसे यांना सवाल नाशिक : प्रतिनिधी पुण्यात रेव्ह पार्टीवर पोलिसांनी…

4 hours ago

साप्ताहिक राशिभविष्य

दि. 27 जुलै ते 2 ऑगस्ट 2025 पुरुषोत्तम नाईक मेष : आप्तेष्टांच्या गाठीभेटी या सप्ताहात…

4 hours ago

महापालिका जिंकायचीय, वाद टाळून कामाला लागा

मंत्री गिरीश महाजन : सुनील बागूल, राजवाडे यांचा अखेर भाजपमध्ये प्रवेश नाशिक ः प्रतिनिधी भारतीय…

4 hours ago

कांदा उत्पादकांवर ओढावणार आर्थिक संकट?

दक्षिण भारत, मध्य प्रदेशातील कांद्याच्या आवकेने भाव गडगडण्याची शक्यता लासलगाव : समीर पठाण गेल्या काही…

5 hours ago

नाफेडने जाहीर केले नवे कांदा खरेदी दर

नाफेडने जाहीर केले नवे कांदा खरेदी दर लासलगाव :- समीर पठाण गेल्या महिन्यापासून नाफेडच्या माध्यमातून…

5 hours ago