नाशिक

कुंभमेळ्यात नाशिकरोड रेल्वेस्थानकात कायमस्वरूपी होल्डिंग एरिया

मंत्री छगन भुजबळ यांच्या मागणीला यश; केंद्राकडून मंजुरी

नाशिक : प्रतिनिधी
राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या विशेष प्रयत्नांतून नाशिक रोड रेल्वेस्थानक येथे कुंभमेळादरम्यान भाविकांची गर्दी टाळण्यासाठी कायमस्वरूपी होल्डिंग एरिया उभारण्यास मान्यता मिळाली आहे. देशातील एकूण 73 रेल्वेस्थानकांमध्ये नाशिकचा समावेश करण्यात आल्याने आगामी कुंभमेळ्यात रेल्वे स्थानकात गर्दी व्यवस्थापन करण्यास मोठी मदत होणार आहे.
दि.16 फेब्रुवारी 2025 रोजी नवी दिल्ली स्थानकावर घडलेल्या चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेनंतर रेल्वे मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली 7 मार्च 2025 रोजी झालेल्या बैठकीत, गर्दी नियंत्रणासाठी देशातील 60 प्रमुख स्थानकांवर कायमस्वरूपी होल्डिंग एरियाची निर्मिती करण्याचा निर्णय झाला आहे. दि. 4 ऑक्टोबर 2024 रोजी रेल्वेमंत्री यांच्या नाशिक दौर्‍यात, स्थानिक आर्किटेक्चर कॉलेजच्या सहकार्याने नाशिक रोड स्थानकाचा पुनर्विकास आणि मल्टीमोडल हब तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. रेल्वे मंत्रालयाने नाशिक रोड स्थानकाच्या पुनर्विकासासाठी 500 कोटींचा निधी मंजूर केला आहे. यामध्ये जी +20 मजली इमारतीचा समावेश आहे. त्याचबरोबर होल्डिंग एरियाची मंजुरी दिल्यास अतिरिक्त खर्च वाचून रेल्वेच्या सुविधांचा उत्तम वापर होईल अशी मागणी मंत्री छगन भुजबळ यांनी रेल्वेमंत्र्यांकडे केली होती.
या अनुषंगाने नाशिकरोड रेल्वेस्थानकावर कायमस्वरूपी होल्डिंग एरियाला मंजुरी देण्यासाठी दि. 17 मार्च 2025 रोजी रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष सतीश कुमार आणि मध्य रेल्वेचे सरव्यवस्थापक धर्मवीर मीना यांना मंत्री छगन भुजबळ यांनी पत्र लिहिले होते. त्यांच्या या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत रेल्वे मंत्रालयाकडून कुंभमेळा 2027 नियोजनाअंतर्गत नाशिक रोड रेल्वेस्थानक येथेपरमंट होल्डिंग एरिया उभारण्यास मान्यता देण्यात आली आहे. तसेच देशातील 73 रेल्वे स्टेशन्स मध्ये नाशिकचा समावेश देखील करण्यात आला आहे.

73 स्थानकांचा गर्दी व्यवस्थापनात समावेश

या 73 स्थानकांवर गर्दी व्यवस्थापनाच्या दृष्टीने प्राधान्याने विविध कामे व उपाययोजनादेखील केल्या जाणार आहेत. यामध्ये गर्दीला स्थानकाबाहेरच थांबवण्यासाठी प्रशस्त प्रतीक्षास्थळांची निर्मिती केली जाणार आहे. अनधिकृत प्रवेश बंद, बॅरिकेडिंग करून फक्त आरक्षित तिकिटधारकांनाच थेट प्लॅटफॉर्मवर प्रवेश दिला जाणार आहे. जनरल डब्यांसाठी प्रवाशांचा प्रवाह पुढील व मागील भागांमध्ये समप्रमाणात विभागणे, 12 मीटर व 6 मीटर रुंदीचे नवीन डिझाइनचे फूटओव्हर ब्रिजेस एफओबी (रॅम्पसह) निर्माण करणे, संपूर्ण परिसरात सीसीटीव्ही बसवून एकत्रित मवार रूमम मधून देखरेख करणे, संपर्कासाठी वॉकी-टॉकी, घोषणा प्रणाली, कॉलिंग सिस्टिम इ. डिजिटल उपकरणे, अधिकृत रेल्वे व ठेकेदार कर्मचार्‍यांसाठी आरपीएफच्या मंजुरीनुसार नवीन ओळखपत्रे देणे, आपत्कालीन परिस्थितीत ओळख सुलभ व्हावी म्हणून सर्व कर्मचार्‍यांना गणवेश असणे अशा उपाययोजना केल्या जाणार आहेत.

 

 

Editorial Team

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

8 hours ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

8 hours ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

8 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

8 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

8 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

8 hours ago