मनमाड : आमिन शेख
मनमाड येथील पानेवाडीच्या इंधन कंपनीच्या टँकर चालकांनी पुन्हा संप पुकारला असुन या संपामुळे मनमाडच्या पानेवाडी भागात असलेले इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम,हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीच्या प्रकल्पातुन केला जाणारा पेट्रोल, डिझेल, गॅस सिलेंडर पुरवठा ठप्प झाला आहे अधिकारी टँकर चालकांची समजुत काढत असुन त्यांनी जर संप मागे घेतला नाही तर उत्तर महाराष्ट्रसह मराठवाड्यात इंधन तुटवडा होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
केंद्र सरकारने ट्रक व टँकर चालक यांच्यासह मोटार व्हेईकल कायद्यात तरतूद करून नवीन कायदा आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. यव कायद्याच्या विरोधात ट्रक आणि टॅंकर चालक रस्त्यावर उतरले असुन जोपर्यंत कायदा मागे घेत नाही तोपर्यंत आम्ही संप सुरू ठेवू अशी भूमिका घेतली आहे यामुळे मनमाड येथील इंडियन ऑइल भारत पेट्रोलियम हिंदुस्थान पेट्रोलियम यासह इंडेन गॅस प्रकल्पातुन केला जाणारा इंधन पुरवठा ठप्प झाला आहे या इंधन कंपनीच्या माध्यमातून उत्तर महाराष्ट्र यासह मराठवाडा व इतर 14 जिल्ह्यात इंधन पुरवठा होतो या संपामुळे हा पुरवठा बंद पडला यामुळे या भागात इंधन तुटवडा होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
जिल्हाधिकारी जजल शर्मा यांनी केली होती मध्यस्थी
यापूर्वी या इंधन टॅंकर चालकांनी संप पुकारला होता सलग दोन दिवस संप सुरू होता मात्र जिल्हाधिकारी जजल शर्मा यांनी तत्काळ दखल घेऊन या ट्रक चालकांशी चर्चा केली व त्यांच्या अडीअडचणी समजून घेऊन त्यांना आम्ही केंद्र कडे याबाबत पाठपुरावा करू सध्या तुम्ही संप मागे घ्या असे आश्वासन दिले यावर केवळ 9 जानेवारी पर्यंत आम्ही थांबू 10 तारखेला संप सुरू करू असे सांगितले होते आज सकाळी 10 वाजेपासून चालकांनी संप सुरू केला आहे.