नाशिक

पिंपळगाव बसवंतला वीस लाखांचे सोने लंपास

शहरातील नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण

पिंपळगाव बसवंत : प्रतिनिधी
पिंपळगाव बसवंत येथील मोबाइल व्यावसायिक समीर ताराचंद सोनी यांच्या घरातील फर्निचर कामाच्या बहाण्याने आरोपी ताराराम घमांडाराम सुतार याने घरातील दागिन्यांच्या लॉकरची चावी मिळवून 20 तोळे सोन्यावर डल्ला मारत फरार झाला आहे. आजच्या बाजारभावाप्रमाणे या सोन्याची किंमत 20 लाखांच्या आसपास जात असल्याने पिंपळगाव बसवंत शहरामध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, समीर सोनी यांचे पिंपळगाव बसवंत शहरात मोबाइलचे दुकान आहे. पिंपळगाव बसवंत येथील जुन्या मार्केट यार्डाजवळ महावीरनगर येथे त्यांच्या सरतारा निवासस्थानी घरातील फर्निचरचे काम सुरू होते. त्यामुळे आरोपी ताराराम सुतार (हल्ली मुक्काम प्रताप चौक, सिडको, नाशिक, मूळ राहणार बालेसर, सत्ताजुडीया, जोधपूर, राजस्थान) हा सोनी यांच्या घरी फर्निचर बनविण्याच्या निमित्त त्याची घरात ये-जा सुरू होती.
फेब्रुवारी 2025 ते 23 मे 2025 पर्यंत फर्निचरचे काम सुरू असल्याने सुतार हा सोनी यांच्या घरामध्ये वावरत होता. घरातील सदस्यांचा विश्वास संपादन करून आरोपीने शिताफीने लॉकरची चावी मिळवली होती.
घरात कुणी नसल्याच्या संधीचा फायदा घेऊन आरोपीने चार तोळे वजनाचे मंगळसूत्र, दोन तोळे वजनाची चेन, दोन तोळे वजनाचे ब्रेसलेट, एक तोळा वजनाचे ब्रेसलेट, एक तोळा वजनाचे कानातील
कर्णफुल, चार तोळे वजनाची अंगठी, तीन तोळे वजनाच्या बांगड्या, दीड तोळे वजनाचे मंगळसूत्र, सव्वा तोळे वजनाचे पॅडल असा एकूण 20 तोळे सोन्याच्या ऐवजावर दरोडा टाकत आजच्या बाजारभावाप्रमाणे 20 लाखांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना पिंपळगाव बसवंत शहरात घडल्याने पिंपळगाव बसवंत पोलीस प्रशासनासमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. समीर सोनी यांनी पिंपळगाव बसवंत पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल केला असून, पोलीस निरीक्षक दुर्गेश तिवारी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मच्छिंद्र कोल्हे अधिक तपास करत आहेत. पिंपळगाव बसवंत शहरात चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे नागरिकांनी किमती वस्तू बाळगायच्या की नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे. पोलिसांचा धाक गुन्हेगारांवर राहिला नाही, अशी कुजबूज सुरू झाली आहे.

पोलिसांचे नागरिकांना आवाहन

या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, फर्निचर कामगार, घरकाम करणारे, प्लंबर, इलेक्ट्रिशियन अशा व्यक्तींची पार्श्वभूमी तपासूनच त्यांना काम द्यावे, असे पोलिसांनी आवाहन केले आहे.

 

Editorial Team

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

1 day ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

1 day ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

1 day ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

1 day ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

1 day ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

1 day ago