नाशिक : विशेष प्रतिनिधी
टोल नाक्यावर महिला कर्मचार्याला अश्लील शिवीगाळ करणार्या एका राजकीय पक्षाच्या महिला पदाधिकारी कारचालकाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा चित्राताई वाघ तसेच राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांना बोलवण्याची धमक असल्याचे वक्तव्यही या व्हिडिओत आहे. अतिशय अश्लाघ्य भाषेतील या व्हिडिओची जोरदार चर्चा झाल्यानंतर हा व्हिडिओ शिवसेना ठाकरे गटाच्या अयोध्या पोळ यांनी ट्विट केला. त्यानंतर ही महिला आमच्या पक्षाची नसून, तिच्यावर कारवाई करण्याची मागणी चित्राताई वाघ यांनी पोलिस महासंचालकांकडे केली. विशेष म्हणजे चित्राताई वाघ यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही ट्विट केले आहे. त्यामुळे ही महिला कोण, कोणत्या पक्षाची पदाधिकारी तसेच कोणत्या कार्यक्रमावरुन परतताना ही घटना घडली महिलेनेच महिला कर्मचार्याला अश्लील शिवीगाळ करण्याचा हा व्हिडिओ गेल्या आठवड्यापासून चांगलाच व्हायरल होत आहे. पिंपळगाव बसवंत टोल नाक्यावरील हा व्हिडिओ असल्याचीही चर्चा आहे. यामध्ये भाजपा व राष्ट्रवादीच्या महिला नेत्यांचे नाव घेत दमदाटी करण्यात आल्याचेही स्पष्ट आहे. मात्र चित्राताई वाघ यांनी याबाबतची आपली भूमिका ट्विटद्वारे स्पष्ट केली आहे. या महिलेला आपण ओळखत नसून ती भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ता तसेच समर्थक नसल्याचे नमूद करताना या महिलेस शोधून तात्काळ कारवाईची मागणी केली .
शरमेची बाब
केवळ 40 रुपयांच्या टोलसाठी या गाडीचालक सुशिक्षित महिलेने टोलवरील महिला कर्मचार्याला अत्यंत अश्लील भाषेत शिवीगाळ केल्याचे व्हिडीओत दिसते आहे. यावरुन या महिलेला नेटकर्यांनी ट्रोल केले आहे.
(या व्हीडिओ मधील भाषा अतिशय अश्लील आहे, म्हणून तो येथे टाकण्यात आलेला नाही)
चित्राताई वाघ यांची पोस्ट
फरार भूषण लोंढेच्या मुसक्या आवळल्या त्याच्यासह सहकार्याला नेपाळ सीमेजवळून अटक सिडको : विशेष प्रतिनिधी सातपूर…
लासलगाव : वार्ताहर निफाड तालुक्यातील थेटाळे शिवारात मंगळवारी दुपारी 2.30 च्या सुमारास अज्ञात वाहनाच्या धडकेत…
हवेची शुद्धता राखण्यासाठी 33 टक्के वृक्ष, झाडी आणि बगीचा असणे गरजेचे आहे, पण झाडांची संख्या…
मतदान यंत्रात किरकोळ तांत्रिक बिघाड; धक्काबुक्की, शाब्दिक बाचाबाची आणि तणावाचे वातावरण सिन्नर : प्रतिनिधी सिन्नरला…
देवगाव, रुई, गोंदेगाव, मरळगोई परिसरात बिबट्यांचा वाढता वावर लासलगाव : वार्ताहर द्राक्ष उत्पादनामुळे जागतिक ओळख…
शेतकरी मेटाकुटीस; गोणीमागे 200 ते 250 रुपये अधिक मोजावे लागणार लासलगाव : वार्ताहर गेल्या काही…