नाशिक

पितृपक्ष पंधरवड्यास सुरुवात

काकस्पर्शाची प्रतीक्षा

नाशिक ः प्रतिनिधी
महालयारंभ अर्थात, पितृपक्ष पंधरवडा सोमवार(दि.8)पासून सुरू झाला आहे. भाद्रपद पौर्णिमेनंतर पितृपक्षाचा पंधरवडा सुरू होतो. भाद्रपद शुक्ल पौर्णिमेपासून ते आश्विन कृष्ण अमावस्या अर्थात, सर्वपित्री अमावस्येचा हा 16 दिवसांचा काळ पितृपक्ष पंधरवडा म्हणून ओळखला जातो. यावेळी 8 ते 21 सप्टेंबरदरम्यान पितृपक्ष आहे. कुटुंबातील मृत व्यक्तींना या पंधरवड्यात श्राद्ध तिथीला नैवेद्य दाखवून आशीर्वाद घेतले जातात.
पितृपक्षात काही उपाय केल्याने पितृऋणापासून आपल्याला मुक्ती मिळते. अनेक समस्यांपासून सुटका होते, अशी धारणा असल्याने आपापल्या पितरांच्या तिथीला मृताच्या आवडीच्या पदार्थांचा नैवेद्य दाखविला जातो. यावेळी मेथी, गवार, कारले, डांगर, खीर-पुरी, उडीदवडे, कढी, अळूवडी, भजी, सांजोर्‍या, वरणभात आदी पदार्थांचा नैवेद्य दाखविण्याची पद्धत आहे. यावेळी अन्नदान केलेे जाते. गायीला घास देण्याची प्रथा असून, अग्नी पेटवून नैवेद्य दाखविला जातो. यावेळी पितरांचे स्मरण केले जाते.
पितरांपर्यंत घास पोहोचावा यासाठी काकस्पर्शाचे महत्त्व आहे. पितरांच्या श्राद्धाच्या दिवशी सकाळी लवकर कावळ्यासाठी नैवेद्य काढला जातो. घराच्या छतावर, नदी, तलाव किनारी घास ठेवत कावळ्याची प्रतीक्षा केली जाते. काकस्पर्श झाल्यावर आशीर्वाद मिळाल्याचे संकेत मिळतात, अशी धारणा आहे. त्यामुळे पितृपक्षात काकस्पर्शाला महत्त्व आहे. पितराच्या मृत्यूची तारीख किंवा तिथी माहीत नसेल तर सर्वपित्री अमावस्येला श्राद्ध करावे. या दिवशी पितरांचे तर्पण किंवा पूजाविधी केल्याने पूर्वज प्रसन्न होऊन आपल्याला आशीर्वाद देतात. यावेळी पिंडदान केले जाते.

श्राद्ध तिथी

दि. 9, मंगळवार द्वितीया श्राद्ध
दि. 10, बुधवार तृतीया व चतुर्थी श्राद्ध
दि. 11, गुरुवार पंचमी श्राद्ध, भरणी श्राद्ध
दि. 12, शुक्रवार षष्ठी श्राद्ध
दि. 13, शनिवार सप्तमी श्राद्ध
दि. 14, रविवार अष्टमी श्राद्ध
दि. 15, सोमवार नवमी श्राद्ध (अविधवा नवमी)
दि. 16, मंगळवार दशमी श्राद्ध
दि. 17, बुधवार एकादशी श्राद्ध
दि. 18, गुरुवार द्वादशी श्राद्ध
दि. 19, शुक्रवार त्रयोदशी श्राद्ध
दि. 20, शनिवार चतुर्दशी श्राद्ध
दि. 21, रविवार सर्वपित्री अमावस्या
दि. 22 सप्टेंबर, सोमवार मातामह श्राद्ध

Editorial Team

Recent Posts

सातपूरला गॅसचा काळाबाजार उघडकीस

पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…

6 hours ago

गुढीपाडव्याच्या निमित्ताने बाजारात उत्साह

मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…

6 hours ago

कचरा करताना कुणीच कचरत नाही…

आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…

6 hours ago

शहरात 12 कोटींचा टीडीआर घोटाळा

स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…

6 hours ago

उन्हाच्या झळांनी धरणांच्या पाणीपातळीत घट

धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…

6 hours ago

चंदुकाका सराफ प्रस्तुत “विवाह तस्मै” कलेक्शन!

पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…

6 hours ago