पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे दूरदृश्यप्रणालीद्वारे बालकांना मार्गदर्शन
नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कोरोनाकाळात पालक गमावलेल्या बालकांना दूरदृश्यप्रणालीद्वारे मार्गदर्शन केले. यावेळी केंद्रीय महिला व बालविकास विभागंतर्गत कोविड-19 मुळे पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी पीएम केअरर्स फॉर चिल्ड्रेन स्कीम योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यातील 55 बालकांना शिक्षण व उज्ज्वल भविष्यासाठी 10 लाख रूपये आर्थिक मदतस्वरूपात त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली आहे. यावेळी जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांच्या हस्ते या बालकांना बँकखाते पासबुक, प्रधानमंत्री जन आरोग्य विमा हेल्थ कार्डचे वाटप करण्यात आले.
आज जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात केंद्रीय महिला व बालविकास विभागाच्या वतीने पीएम केअरर्स फॉर चिल्ड्रेन स्कीम या कार्याक्रमाचे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत दूरदृश्यप्रणालीद्वारे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्ह्यातुन आमदार सिमा हिरे, जिल्हाधिकारी गंगाथरन डी., महिला व बालकल्याण विभागीय आयुक्त चंद्रशेखर पगारे, उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे, जिल्हा महिला बाल विकास अधिकारी अजय फडोळ, राज्य बालहक्क संरक्षण समितीच्या सदस्य सायली पालखेड, बाल न्याय मंडळाच्या सदस्य शोभा पवार, शुभांगी बेळगावकर उपस्थित होते. तसेच दिल्ली येथून दूरदृश्यप्रणालीद्वारे केंद्रीय महिला व बालविकास विभाग मंत्री स्मृती ईराणी उपस्तित होते.
पीएम केअरर्स फॉर चिल्ड्रेन या योजनेंतर्गत जिल्ह्यातील एकुण 55 बालकांना यावेळी 10 लाख रूपयाचे पासबूक, 5 लाख रूपये प्रधानमंत्री जनधन आरोग्य विमा हेल्थ कार्ड, जिल्हाधिकारी यांच्या सहीने अनाथ असल्याचे प्रमाणपत्र आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बालकांसाठी लिहीलेले संदेश पत्र यावेळी जिल्हाधिकारी गंगाथरन डी, यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. यावेळी 18 ते 23 वयोगटातील 8 बालके व इतर लहान गटातील बालक या कार्यक्रमात उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व समारोप केंद्रीय महिला व बालविकास मंत्री स्मृती इराणी यांनी यावेळी दूरदृश्यप्रणालीद्वारे केले.
हे ही वाचा :