सिडको : विशेष प्रतिनिधी
अंबडच्या महालक्ष्मीनगर भागात दोन दिवसांपूर्वी रात्री सुमारे अकरा ते साडेअकरा वाजेच्या सुमारास घडलेल्या खून प्रकरणातील आरोपींना अंबड पोलिसांनी अवघ्या दोन तासांंत गजाआड केले. या पार्श्वभूमीवर सोमवारी (दि. 30) अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांच्या पथकाने आरोपींची खून झालेल्या परिसरातून धिंड काढून नागरिकांमध्ये कायदा व सुव्यवस्थेचा संदेश दिला.
या घटनेविषयी मिळालेल्या माहितीनुसार, महालक्ष्मीनगर परिसरात राहणार्या 22 वर्षीय युवकाचा काही कारणावरून वाद झाला होता. या वादातूनच आरोपींनी धारदार शस्त्राने वार करत युवकाचा निर्घृण खून केला व घटनास्थळाहून फरार झाले. खून झाल्यानंतर अंबड पोलीस ठाण्याच्या गुन्हेशोध पथकाने तत्परता दाखवत घटनास्थळाजवळील व परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. या तांत्रिक पुराव्यांच्या आधारे व गोपनीय माहितीच्या साहाय्याने पोलिसांनी दोन्ही आरोपींना अवघ्या दोन तासांत शोधून काढले व अटक केली.
या प्रकरणातील पोलिसांच्या जलद कारवाईमुळे परिसरातील नागरिकांमध्ये दिलासा निर्माण झाला आहे. गुन्हा घडलेल्या भागातून आरोपींची पोलिसांच्या ताब्यात असताना काढलेल्या धिंडमुळे कायदा व सुव्यवस्थेचा धाक निर्माण झाला असून, गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना इशारा देण्यात आला आहे. या संपूर्ण कारवाईत वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्यासह अंबड पोलीस ठाण्याची टीम सक्रियपणे सहभागी झाली. नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलिसांकडून असेच कठोर पाऊल उचलले जाईल, असा स्पष्ट संदेश पोलिसांनी दिला आहे.
खा. वाजे : शिवसेना कार्यालयात मनसे पदाधिकार्यांची उपस्थिती नाशिक : प्रतिनिधी सरकारला हिंदीसक्तीचा निर्णय मागे…
धरण समूहात 47 टक्के; गंगापूर धरणात 56 टक्के पाणीसाठा नाशिक : प्रतिनिधी जिल्ह्यात गेला महिनाभर…
चेन खेचल्याने वीस दिवसांत 98 गाड्यांना विलंब नाशिकरोड : प्रतिनिधी रेल्वेची विनाकारण चेन ओढण्यामुळे 1…
सध्या सुरू असलेल्या पहिलीपासूनच्या त्रिभाषा सूत्रासंदर्भात आपण सर्व मराठी बांधवांनी जाणून घ्यायला हवे आपल्या मराठी…
पारोळा : एका अनोळखी महिलेच्या डोक्यात दगड टाकून हत्या करण्यात आली होती. यानंतर महिलेचा मृतदेह…
अभोणा ग्रामपालिकेचे दुर्लक्ष, कचरा डेपोसाठी जागा नसल्याचा जावईशोध अभोणा : प्रतिनिधी देशभर स्वच्छ भारत मिशनचा…