एकनाथ शिंदे गट फुटीच्या उंबरठ्यावर?
मुंबई
विधानपरिषद निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने विशेषतः देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीचे मते फोडून दणका दिला असतानाच आता गेल्या काही दिवसांपासून नाराज असलेलं ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे शिवसेनेला धक्का देणार असल्याची चर्चा आहे, विधानपरिषद निवडणुकीचा निकाल लागताच एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटाचे अकरा आमदार नॉट रीचेबल झाले आहेत, ते सर्व गुजरातमध्ये असल्याचे वृत्त टीव्ही वाहिन्यांनी दिले आहे,
गेल्या काही दिवसांपासून एकनाथ शिंदे आणि गट नाराज आहे, विधानपरिषद निवडणुकीत शिवसेना उमेदवारांना पहिल्या पसंतीची 55 मते मिळणे अपेक्षित असताना 52 मतेच दोन्ही उमेदवारांना मिळाली, शिवसेनेचे 3 मते फुटली, तर काँग्रेस ची देखील मते फुटली, त्यामुळे शिवसेनेनं आज दुपारी12 वाजता बैठक बोलावली आहे, या बैठकीला कोण कोण उपस्थित राहणार याकडे लक्ष लागले आहे