संपादकीय

‘देवा’च्या इच्छेनुसारच राजकारण आणि सत्ताकारण

राज्यातील नुकत्याच पार पडलेल्या 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे भाजप नंबर एक राहिला. या निवडणुकीत सर्वांना उत्सुकता आहे ती मुंबईचा कारभारी कोण होणार? आणि कारभार्‍यावर लक्ष ठेवण्यासाठी पहारेकरी कोण होणार? भाजप (89 जागा) आणि शिवसेना शिंदे गट (29) यांच्याकडे स्पष्ट बहुमत आहे. मात्र, ते काठावरचे म्हणजेच बहुमतापेक्षा केवळ चार मते जास्त आहे. इकडे शिवसेना उबाठा आणि मनसे मिळून 72, तर काँग्रेसचे 24 नगरसेवक आहेत.
महापौरपदाची निवडणूक होण्यास वेळ लागणार आहे. आधी नगरविकास खात्याकडून आरक्षण सोडत निघेल. त्यानंतर महापौरपदाची निवडणूक होईल. पहिल्यांदा मुंबईच्या महापौरपदी आपला नगरसेवक बसवायची संधी भाजपला मिळण्याची शक्यता आहे. सन 2017 साली झालेल्या निवडणुकीत भाजपने (84) नगरसेवक निवडून आणले होते. मात्र, तेव्हा त्यांनी त्यावेळेस शिवसेनेला 82 नगरसेवक असताना महापौरपदाची संधी दिली. त्यामुळे यावेळी भाजप संधी सोडण्याची शक्यता नाही. पक्षीय बलाबल पाहता ते साहजिकच आहे. मात्र, शिवसेना शिंदे गटाची मदत घेतली तरच ते शक्य आहे. त्यातून शिंदेसेनेकडून संकटात संधी शोधत बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षांचे निमित्त पुढे करून शिवसेनेचा महापौर व्हावा यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
यासाठी कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर महापालिकांच्या राजकारणाचादेखील संदर्भ आहे. ठाण्यात शिंदेसेनेला एकहाती सत्ता मिळाली आहे. मात्र, तेथे भाजप प्रसंगी विरोधी पक्षात बसू, अशी भाषा करत आहे. शिवसेनेने आपल्या सर्व नगरसेवकांना एका हॉटेलमध्ये ठेवले आहे. ते कशासाठी, याचा उलगडा होत आहे. दुसरीकडे, उद्धव ठाकरे हेदेखील महापौरपदाबाबत हालचाली करत आहेत आणि त्यांची नजर शिंदेसेनेच्या नगरसेवकांवर आहे. राजकारणात कोणीही कोणाचा कायमचा मित्र वा शत्रू नसतो, हे लक्षात घेऊन राजकारण, सत्ताकारण चालते.
निवडणूक संपताच देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुका संपल्या. आता आमचे कुणाशी शत्रुत्व नाही, असे म्हटले आहे, तर उद्धव ठाकरे यांनी ’देवा’ची इच्छा असेल तर आपला महापौर होईल, असे नगरसेवकांशी बोलताना सांगितले. दोघांमध्ये चर्चादेखील झाल्याची चर्चा होत आहे.
गेल्या काही वर्षांपासून राज्याचे राजकारण आणि सत्ताकारण हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याभोवतीच फिरत आहे. भाजपच्या या यशाचे खरे शिल्पकार दिल्लीचे वंडरबॉय ’देवेंद्र फडणवीस’ हेच युगंधर आहेत, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले. 2014 च्या सत्तांतरानंतर देशात आणि राज्यात ’सब कुछ बीजेपी’ असे चित्र निर्माण झाले आहे.
सन 2014 च्या विधानसभा निवडणुकीत ’देशात नरेंद्र – राज्यात’ देवेंद्र’याची मोठी चर्चा झाली आणि देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राज्याचे मुख्यमंत्रिपद आले. त्यांनी संधीचे सोने करत शत-प्रतिशत भाजपला प्रत्येक निवडणुकीत यश मिळवून दिले. याला अपवाद होता तो 2024 च्या लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपला केवळ नऊ जागा मिळाल्या. त्याचे शल्य त्यांनी बोलून दाखवले. मात्र, नाउमेद न होता त्यांनी विधानसभा निवडणुकीत भाजपला ऐतिहासिक बहुमत मिळवून दिले. वयाच्या अवघ्या बाविसाव्या वर्षी ते नागपूर महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले.
कालांतराने महापौर झाले. 1999 मध्ये पहिल्यांदा विधानसभेत पोहोचले. त्यानंतर त्यांच्या यशाची चढती कमान एक एक यश मिळवत सुरूच आहे. 2019 साली मुख्यमंत्रिपदाची संधी हुकली म्हणून नाउमेद न होता त्यांनी राजकीय कौशल्य दाखवत 2022 मध्ये चमत्कार करत मविआ सरकारचा करेक्ट कार्यक्रम केला. 2022 साली शिवसेना आणि 2023 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांचादेखील करेक्ट कार्यक्रम त्यांनी केला.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळाचे तर टायमिंगच चुकवून टाकले. दिल्लीत जसे अमित शहा यांना राजकारणातील चाणक्य म्हणून ओळखले जाते, तसेच राज्यात ’देवा’भाऊंना ज्युनिअर चाणक्य म्हणून ओळखले जाते. भविष्यातदेखील त्यांना अनेक संधी मिळण्याची शक्यता आहे. वय ही त्यांची जमेची बाजू आहे.
दिल्लीतदेखील त्यांच्या शब्दाला वजन आहे आणि अनेकदा भविष्यातील पंतप्रधान म्हणून त्यांचे नाव घेतले जाते. पक्षाचा एकनिष्ठ, सच्चा कार्यकर्ता कसा असावा हे फडणवीस यांनी दाखवून दिले आहे. प्रसंगी मुख्यमंत्रिपद भूषवले असतानाही उपमुख्यमंत्रिपद स्ीवकारले होते. आता जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांतदेखील भाजपला घवघवीत यश मिळेल, याबाबत दुमत नाही. तेव्हा मुंबई काय किंवा इतर महानगरपालिकांच्या सत्ताकारणात ’देवा’ची इच्छा काय असेल यावर बरेच काही अवलंबून आहे.

Politics and power are only according to the will of ‘God’

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

दादांची अकाली एक्झिट ! जिल्हा शोकसागरात

सर्वपक्षीयांकडून जड अंतःकरणाने श्रद्धांजली; कार्यकर्त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला नाशिक ः प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख…

5 hours ago

स्मार्ट पार्किंगचे घोडे अडलेलेच!

टेंडर सेलकडून कार्यवाही होईना... नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिका शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी…

6 hours ago

बांगलादेश क्रिकेट बोर्डाचा आत्मघातकी निर्णय

बांगलादेशने दुराग्रही भूमिका घेऊन भारतात होणार्‍या टी-20 विश्वचषक स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशचा हा…

6 hours ago

अजितदादांची साथ नेहमी स्मरणात राहील!

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अपघाती निधन वेदनादायी आहे. राज्याचे सहा वेळा उपमुख्यमंत्री म्हणून व दीर्घकाळ…

6 hours ago

पवार परिवारावर आघात

महाराष्ट्रात ज्यांना जाणता राजा म्हटले जाते, त्या शरद पवारांच्या सावलीत वाढलेले एक बोलके, दिलखुलास राजकीय…

6 hours ago

मीठसागरे शिवारात बिबट्या मादी जेरबंद

सिन्नर : प्रतिनिधी तालुक्यातील मीठसागरे शिवारात बुधवारी (दि. 28) सकाळी चार वर्षे वयाची बिबट्याची मादी…

6 hours ago