नाशिक

मंत्र्यांच्या दालनात सकारात्मक चर्चा; 58 व्या दिवशी सुटले उपोषण

सिन्नर : प्रतिनिधी
राज्यमार्ग 37 च्या वाढीव भूसंपादनाचा मोबदला मिळावा, या मागणीसाठी गेल्या 58 दिवसांपासून चिंचोली येथे सुरू असलेल्या साखळी उपोषणाची गुरुवारी (दि.19) सांगता झाली. बुधवारी मंत्रालयात महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दालनात कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांच्या मध्यस्थीने शेतकर्‍यांच्या शिष्टमंडळासमवेत झालेल्या बैठकीत सरकारने भूसंपादनाच्या मोबदल्यासंदर्भात सकारात्मक भूमिका घेतल्यानंतर शेतकर्‍यांनी आंदोलन मागे घेतले. दहा दिवसांत पुन्हा अंतिम निर्णयासाठी बैठक घेण्याचे ठरले.

दरम्यान, गुरुवारी (दि.19) तहसीलदार सुरेंद्र देशमुख यांनी शेतकर्‍यांची भेट घेतली. शेतकर्‍यांच्या मागण्यांबाबत सरकार सकारात्मक असून, शेतकर्‍यांनी उपोषण सोडावे, अशी विनंती केली. यावेळी भाजपचे नेते उदय सांगळे यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्याशी भ्रमणध्वनीवरून आंदोलक शेतकर्‍यांचे बोलणे करून दिले. लवकरात लवकर शासन या प्रश्नी तोडगा काढेल, असे आश्वासन महाजन यांनी दिल्यानंतर आंदोलक शेतकर्‍यांना लिंबू सरबत देऊन उपोषणाची सांगता झाली.
बुधवारी (दि.18) अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, आमदार माणिकराव कोकाटे, भाजपचे जिल्हाध्यक्ष सुनील बच्छाव, भाजपचे नेते उदय सांगळे, सचिव मिलिंद म्हैसकर यांच्या उपस्थितीत महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दालनात मंत्री गिरीश महाजन यांच्या मध्यस्थीने या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
आंदोलक शेतकर्‍यांच्या शिष्टमंडळातील भास्कर उगले, भाऊराव झाडे, कचरू गंधास, भाऊसाहेब हरळे, दौलत झाडे, मुरली नागरे, ज्ञानेश्वर सानप, दत्तू नागरे, विठ्ठल सांगळे, पांडुरंग झाडे, सुदाम मुठाळ, रामदास झाडे, सदाशिव झाडे, शांताराम कुटे, अंबादास झाडे आदींनी चर्चेत सहभाग घेतला.
कुंभमेळ्यासाठी तयार करण्यात येणार्‍या राज्यमार्ग क्रमांक 37 साठी डीनोटिफिकेशन करावे म्हणजे पूर्वीप्रमाणेच रस्ता राहील किंवा शेतकर्‍यांचे क्षेत्र रस्ता रुंदीकरणामुळे संपादित होत असेल तर त्याचा मोबदला दिला जावा, अशी मागणी यावेळी शेतकर्‍यांनी केली. तर उदय सांगळे यांनी शेतकर्‍यांना संपादित क्षेत्राचा मोबदला देण्याची मागणी केली.
दरम्यान, दोन्हीपैकी कुठलाही निर्णय घ्यायचा असेल तर तो शेतकर्‍यांना विश्वासात घेऊन घेतला जाईल. तो शेतकर्‍यांच्या हिताचाच असेल, असे आश्वासन मंत्री बावनकुळे यांनी दिले. गरज पडल्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशीही चर्चा करून मार्ग काढण्याचे ठरले.

महाजनांची मध्यस्थी फळाला

उदय सांगळे यांनी संकटमोचक गिरीश महाराज यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला. महाजन यांनीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री बावनकुळे यांच्याकडे शेतकर्‍यांच्या प्रश्नाचा पाठपुरावा केला. त्यानंतर मंत्रालयात सकारात्मक बैठक झाली.

Positive discussions in the cabinet; Fast ended on the 58th day

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

कुत्र्यामुळे सुसाईड नोट लिहून बँक कर्मचाऱ्याची आत्महत्या

कुत्र्यामुळे सुसाईड नोट लिहून बँक कर्मचाऱ्याची आत्महत्या शहापूर: प्रतिनिधी 30 वर्षीय बँक कर्मचाऱ्याला भटक्या श्वानानं…

2 hours ago

पडोसन

पडोसन नावाचा विनोदी चित्रपट तुम्हाला सगळ्यांना आठवत असेलच.... एक -एक पात्र अतिशय विनोदी... तर अशीच…

7 hours ago

फुलोरा…

‘फार फार तर वारा बाहेरून येईल पण फुलून तर आतूनच यावे लागते..’ कविवर्य संजय चौधरी…

7 hours ago

श्रद्धा, ट्रेंड आणि माणूस

नुकताच फेसबुकवरील एका पेजवर डॉ. प्रज्ञावंत सरांचा लेख वाचनात आला. त्यांच्या लेखातील काही मुद्दे मनाला…

7 hours ago

आवडता कोपरा

खुणावतो का मला माहेरचा तो कोपरा, जरी असला आज, माझा संसार हसरा.... बंद कुपी असते…

7 hours ago

खंजीर आणि खाज

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या तत्त्वांचा बाजार आणि सोयीच्या युतींचा सुकाळ झाला असून, एकेकाळचे कट्टर विरोधक आता…

8 hours ago