वादळासह पावसावर निफाडला महावितरण कर्मचार्यांची मात
निफाड ः तालुका प्रतिनिधी
मे महिन्याच्या सुरुवातीपासूनच पावसाने धडाका लावला. त्यात वादळी वार्यामुळे सर्वत्र नुकसान झाले. पण महावितरणचे अधिकारी व कर्मचारी यांनी न डगमगता नियोजनबद्ध त्यावर मात केली. निफाड उपविभागांतर्गत वीजपुरवठा सुरळीत करण्याचे काम महावितरणने केले. याबाबत नागरिकांकडून महावितरणचे अधिकारी व कर्मचार्यांची प्रशंसा होत आहे.
शहरासह परिसरात सोमवारी (दि.26) सायंकाळी वादळी वार्यासह पावसाने वीजतारा तुटल्या. वीजवाहिन्यांवर झाडे पडली. काही ठिकाणी खांब कोसळले. असे असताना महावितरणचे मुख्य अभियंता सुंदर लटपटे, अधीक्षक अभियंता थूल व कार्यकारी अभियंता केशव काळूमाळी यांनी दिलेल्या निर्देशानुसार उपकार्यकारी अभियंता नीलेश नागरे यांनी केलेल्या नियोजनामुळे शाखा अभियंता योगेश जाधव यांना दिलेल्या सूचनेनुसार कर्मचार्यांनी टप्प्याटप्प्याने बंद वीजपुरवठा सुरळीत केला. निफाड शहरात जवळपास 40 ट्रान्स्फॉर्मर बंद पडले असताना, अवघ्या काही तासांत संपूर्ण निफाडचा वीजपुरवठा सुरळीत केला. यावेळी जनमित्र टबाले, योगेश काळे, विशाल शिंदे, अमोल नागरे, सचिन आव्हाड, लाइनमन झाकरे आदींनी मेहनत घेतली.
तालुक्यात उलट स्थिती
तालुक्याच्या काही ग्रामीण भागात याउलट स्थिती पाहावयास मिळाली.
ट्रान्स्फॉर्मरचा बंद वीजपुरवठा सुरू करण्यासाठी चक्क अभियंत्यांशी
बोलूनदेखील कर्मचार्यांच्या उद्धट वर्तणुकीचा सामना करावा लागला.
वायरमन गावात गप्पा मारत असतानाही ते अभियंत्यांशी बोलताना
मात्र मी कम्प्लेट काढत आहे, असे सांगत होते.
अशा कर्मचार्यांनी अभियंता नीलेश नागरे यांचा आदर्श घेणे गरजेचे आहे
. काही कर्मचारी इमानदार, कर्तव्यतत्परदेखील आहेत.
अधिकार वर्ग चांगला आहे. मात्र, आपत्कालीन प्रसंगाचे गांभीर्य कर्मचार्यांनीही
लक्षात घेणे गरजेचे आहे.
साखरपुडा एकाशी, लग्न त्याच्याच मित्राशी प्रेमात धोका, स्टेटस ठेवले अन् पुढे घडले... सद्या प्रेमाची व्याख्याच…
नाशिकरोड : प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदावरुन जयंत पाटील पायउतार झाले असून,…
शहापूर: साजिद शेख पन्नास हजार रुपये दिल्यास त्याचे पाच लाख रुपये करुन देतो असे सांगून दोन…
फेसबुक तरुणीच्या बोलण्याला भाळला अन दोन कोटी गमावून बसला शहापूर : साजिद शेख एका…
अलिशान वाहनातून गुटख्याची तस्करी करणारा गजाआड दोघांवर गुन्हा, 11 लाख रुपयांचा ऐवज वाहनासह जप्त दिंडोरी…
उज्ज्वल निकम होणार खासदार नाशिक: प्रतिनिधी 1993 च्या बॉम्बस्फोट खटल्यासह अनेक महत्त्वाच्या खटल्यात महत्वपूर्ण कामगिरी…