नाशिक

पांगरीत स्विफ्ट कारच्या धडकेत गर्भवती महिलेचा मृत्यू

सिन्नर ः प्रतिनिधी
तालुक्यातील पांगरी येथे सिन्नर-शिर्डी महामार्गावर पालखी रोडने जाणार्‍या स्विफ्ट कारने धडक दिल्याने झालेल्या अपघातात पादचारी गर्भवती महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी (दि.6) रात्री 9.30 वाजेच्या सुमारास घडली. रविना तुषार निरगुडे (32, रा. पांगरी बु.) असे मयत महिलेचे नाव असून, ती सात महिन्यांची गर्भवती होती. आईचा मृत्यू झाल्याने पोटातील 7 महिन्यांचे बाळही दगावल्याने हळहळ व्यक्त केली
जात आहे.
सिन्नर-शिर्डी मार्गावर पांगरी शिवारात साईपालखी मार्गाच्या कडेला निरगुडे यांची वस्ती आहे. शुक्रवारी (दि.6) रात्री रविना निरगुडे यांच्यासह वस्तीवरील आणखी दोन-तीन महिला जेवण झाल्यानंतर पालखी मार्गाने शतपावली करत होत्या. यावेळी पांगरीकडून सिन्नरच्या दिशेने पालखी मार्गाने भरधाव वेगात आलेल्या स्विफ्ट कारने (क्र. एमएच-15, ईपी-4253) रविना यांना जोराची धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या रविना यांना तातडीने उपचारांसाठी सिन्नरच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डोक्याला गंभीर मार लागून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने त्यांचा उपचारांपूर्वीच मृत्यू
झाला होता.
दरम्यान, गर्भवती महिलेचे बाळही पोटातच दगावले होते.डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केल्यानंतर सिन्नर ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात शनिवारी (दि.7) सकाळी शवविच्छेदन करण्यात आले. अनिल निरगुडे यांनी दिलेल्या खबरीवरून वावी पोलिसांत अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार बैरागी करत आहेत.
दरम्यान, काल दुपारी शोकाकुल वातावरणात पांगरी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. या महिलेच्या पश्चात 7 वर्षांची मुलगी, पती, सासू, सासरे, आई-वडील, भाऊ असा परिवार आहे. येथून जवळच असलेल्या वल्हेवाडी येथे या महिलेचे
माहेर आहे.

Gavkari Admin

Recent Posts

ऑनलाइन दोन हजारांचे कर्ज पडले महागात, तरुणीसोबत जे घडले ते भयानकच

ऑनलाइन दोन हजारांचे कर्ज पडले महागात तरुणीसोबत जे घडले ते भयानकच शहापूर: साजिद शेख जाहिरातीला…

6 hours ago

उदघाटनापूर्वीच करंजवन – मनमाड पाईपलाईन फुटली

उदघाटनापूर्वीच करंजवन - मनमाड पाईपलाईन फुटली खेडगावजवळ शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान.. मनमाड : आमिन शेख मनमाड…

1 day ago

नाशिक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून यांची नियुक्ती

नाशिक प्रतिनिधी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांची जालना येथे जिल्हाधिकारी म्हणून बदली…

1 day ago

अशोकनगरमध्ये १६ वर्षीय  मुलाचा संशयास्पद मृत्यू, परिसरात खळबळ

अशोकनगरमध्ये १६ वर्षीय  मुलाचा संशयास्पद मृत्यू, परिसरात खळबळ सिडको/ सातपूर: प्रतिनिधी : सातपूरच्या अशोकनगर परिसरात…

4 days ago

मालेगाव शहरात तरुणाची डोक्यात दगड घालून हत्या

तिघांना अटक; घटना सीसीटीव्हीत कैद मालेगाव : प्रतिनिधी शहरातील जुना आग्रारोडवरील नानावटी पेट्रोलपंपाजवळ एका तरुणाची…

4 days ago

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांत मराठीचा डंका

श्यामची आई उत्कृष्ट सिनेमा; शाहरूख खान, राणी मुखर्जीलाही पुरस्कार नवी दिल्ली : भारतातील राष्ट्रीय पुरस्कारांची…

4 days ago