नाशिक

ओझर खंडेराव महाराजांच्या यात्रेची जय्यत तयारी

चंपाषष्ठीपासून प्रारंभ; बारागाड्या ओढणे खास आकर्षण

ओझर : वार्ताहर
संपूर्ण नाशिक जिल्ह्यातील अनेक ठिकाणी असलेल्या खंडेराव महाराजांच्या यात्रांपैकी जनतेचे आकर्षण असलेली ओझर येथील खंडेराव महाराजांची यात्रा सर्वांत मोठी यात्रा असून, या यात्रेचा प्रारंभ चंपाषष्ठीला दि. 26 रोजी होत आहे. ही यात्रा पाच दिवस असते. या यात्रेला प्रारंभ झाल्यानंतर जिल्ह्यातील इतर ठिकाणच्या यात्रांना टप्प्याटप्प्याने सुरुवात होते.
ओझर येथील मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गाला समांतर असलेल्या बाणगंगा नदीवरील बाणगंगा पुलाजवळील खंडेराव महाराज यांच्या या यात्रेच्या पहिल्या दिवसाचे खास आकर्षण असते. बारागाड्या ओढणे पंचक्रोशीतील बारा वाड्यांतील बारागाड्या असतात. त्यामध्ये देवाचा गाडा प्रथम असतो. त्यानंतर वस्ती, वाड्यांतील गाड्यांचा
समावेश असतो.

यात्रेच्यावेळी देवाची सेवा करण्याचा मान वेगवेगळ्या लोकांना आहे. त्यात भगत, चोपदार, घोडेवाले, पालखीवाले, चौरीवाले, ढालवाले, काठीवाले, भोई हरदास शिंगवाले, वाघोजी यांचा समावेश आहे. या यात्रेत बारागाडे मिरवणुकीने यात्रा मैदानावर आणले जातात. मिरवणुकीच्या वेळी मल्ल कसरत करतात. दरम्यान, देवाची पालखी मिरवणूक काढण्यात येते. भाविकांकडून भंडार्‍याची उधळण करीत ‘यळकोट यळकोट जय मल्हार’ अशा जयघोषात घोडा बारागाड्या ओढून नेतो. बारागाड्या ओढण्यापूर्वी खंडेराव महाराजांच्या चांदीच्या मुकुटाची पालखी व मानाच्या घोड्याची सवाद्य मिरवणूक काढली जाते. खंडेराव महाराजांची यात्रा शांततेत व उत्साहाच्या वातावरणात पार पाडावी, असे आवाहन ओझर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी किरण देशमुख, पोलीस निरीक्षक समीर केदार यांच्यासह यात्रा कमिटीने
केले आहे.

 

Editorial Team

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

21 hours ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

21 hours ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

21 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

21 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

22 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

22 hours ago