नाशिक

वादळी वाऱ्यासह मान्सून पूर्व पावसाची हजेरी

नागरिकांची उडाली धांदल, कुठे झाडे कोलमडली तर कुठे उडाले छप्पर
सिन्नर:जून महिना नुकतंच सुरू झालाय. जून उजाडला तसं मान्सून पूर्व पावसाने हजेरी लावली आहे. महाराष्ट्रातल्या अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. सिन्नर तालुक्यातही मान्सून पूर्व वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली आहे. रविवार आठवडा बाजार असल्याने सिन्नर शहरात शेतकऱ्यांसह व्यापारी वर्गाची धांदल उडालेली बघायला  मिळाली.वादळी वाऱ्यामुळे काही ठिकाणी रस्त्यांवर झाडे कोलमडली, तर काही ठिकाणी विजेच्या तारा तुटल्या.
गेल्या काही दिवसांपूर्वी तापमानात अचानक वाढ झाल्यामुळे मोठ्या प्रमाणावर उकाड्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत होता. मात्र सकाळी उन्हाचे चटके लागत होते आणि दुपारी अचानक वादळी वाऱ्याला सुरुवात झाली.यात तालुक्यातील कोमलवाडी येथे व्यायामशाळेचे छत उडाले तर मेंढी – सोमठणे रस्त्यावर झाड पडल्याने काही काळ वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता. दातली येथे झाडाची फांदी पडल्याने विजेच्या तारा तुटून विजपुरवठा खंडित झाला होता
Ashvini Pande

Recent Posts

ठेकेदारीवरील महापालिका कर्मचार्‍यांच्या वेतनात भ्रष्टाचार

आ. देवयानी फरांदे यांची लक्षवेधी नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेत ठेकेदारीवर नियुक्त करण्यात येणार्‍या कर्मचार्‍यांच्या…

1 hour ago

प्लास्टिकमुक्तीसाठी नागरिकांचीच उदासीनता

आंतरराष्ट्रीय प्लास्टिक पिशवीमुक्त दिन नाशिक ः प्रतिनिधी दोन वर्षांनी सिंहस्थ पर्वणी येत आहे. त्यानिमित्ताने नाशिक…

1 hour ago

आवक घटली, भाजीपाल्याचे दर कडाडले

नाशिक : प्रतिनिधी जिल्ह्यात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे भाजीपाल्याची आवक घटली आहे. सततच्या पावसामुळे भाजीपाला…

3 hours ago

सेंट्रल किचनमध्ये अस्वच्छता; गुणवत्तेचे तीनतेरा

दोन संस्थांना प्रशासनाधिकारी डॉ. चौधरींच्या नोटिसा नाशिक : प्रतिनिधी मनपा शाळांमधील विद्यार्थ्यांना दिल्या जाणार्‍या पोषण…

3 hours ago

सहा हजार मिळकती मालमता कराच्या कक्षेत !

मनपाच्या तिजोरीत पडणार साडेबारा कोटींची भर, नोंद नसलेल्या मालमत्तांचा शहरात शोध नाशिक : प्रतिनिधी महापालिकेच्या…

3 hours ago

पावसाळ्यात घ्यायची काळजी

सामान्य माणसाने आयुर्वेदाच्या दृष्टीने पावसाळा म्हणजे थोडा आनंद, आणि भरपूर आजारपणाची भीती. पावसाळ्यात वातावरणात ओलावा…

3 hours ago