राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय

पंतप्रधान मोदी यांच्या आई हिराबेन यांचे निधन

अहमदाबाद: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन यांचे आज पहाटे साडेतीन च्या सुमारास निधन झाले, त्या 100 वर्षांच्या होत्या, त्यांना श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने  अहमदाबाद येथील यु एन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, त्यांची प्रकृती सुधारत असतानाच पहाटे ती खालावली, पहाटे 3.30 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला, मोदी यांनी आईच्या निधनानंतर ट्वीट केले, एक गौरवशाली शतक देवाच्या चरणी विसावले, आईमध्ये मला ते त्रिमूर्ती जाणवते, ज्यामध्ये एका तपस्वीचा प्रवास, निस्वार्थी कर्मयोगी आणि मूल्यांसाठी वचनबद्ध जीवनयात्रा यांचा समावेश होतो.हिराबेन मोदी यांच्या निधनाबद्दल हळहळ व्यक्त होत आहे.

Ashvini Pande

अश्विनी पांडे या 2019 पासून पत्रकारितेत कार्यरत असून, सध्या दैनिक गांवकरीत ऑनलाइन कंटेंट क्रीएटर तसेच उपसंपादक म्हणून कार्यरत आहे. त्यांना राजकीय व सामाजिक, सांस्कृतिक विषयाचे सखोल ज्ञान असून, साहित्य संमेलन, राजकीय सभा, राजकारणातील घडामोडी या विषयावर त्यांनी विपुल लेखन केलेलं आहे. विज्ञान शाखे बरोबरच पत्रकारितेतील पदवी बरोबरच साहित्यातील पदव्यूत्तर पदवी त्यांनी प्राप्त केलेली आहे.पत्रकारितेतील योगदानाबद्दल त्यांना विविध सन्मानही प्राप्त झालेले आहेत.

Recent Posts

दादांची अकाली एक्झिट ! जिल्हा शोकसागरात

सर्वपक्षीयांकडून जड अंतःकरणाने श्रद्धांजली; कार्यकर्त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला नाशिक ः प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख…

8 hours ago

स्मार्ट पार्किंगचे घोडे अडलेलेच!

टेंडर सेलकडून कार्यवाही होईना... नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिका शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी…

9 hours ago

बांगलादेश क्रिकेट बोर्डाचा आत्मघातकी निर्णय

बांगलादेशने दुराग्रही भूमिका घेऊन भारतात होणार्‍या टी-20 विश्वचषक स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशचा हा…

9 hours ago

अजितदादांची साथ नेहमी स्मरणात राहील!

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अपघाती निधन वेदनादायी आहे. राज्याचे सहा वेळा उपमुख्यमंत्री म्हणून व दीर्घकाळ…

9 hours ago

पवार परिवारावर आघात

महाराष्ट्रात ज्यांना जाणता राजा म्हटले जाते, त्या शरद पवारांच्या सावलीत वाढलेले एक बोलके, दिलखुलास राजकीय…

9 hours ago

मीठसागरे शिवारात बिबट्या मादी जेरबंद

सिन्नर : प्रतिनिधी तालुक्यातील मीठसागरे शिवारात बुधवारी (दि. 28) सकाळी चार वर्षे वयाची बिबट्याची मादी…

10 hours ago