नाशिक

इंजिनीयरिंग टॅलेंट सर्च स्पर्धेचा आज पारितोषिक वितरण समारंभ

नाशिक :प्रतिनिधी
लघु उद्योग भारती नाशिक आयोजित,इंजिनीयरिंग टॅलेंट सर्च – २०२३ स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ आज बुधवार दि. १७  रोजी दुपारी ४:०० ते सायं. ७:०० यावेळेत
हॉटेल एक्सप्रेस इन येथे  होणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत  लघु उद्योग भारती नाशिक  अध्यक्ष  विवेक कुलकर्णी ,कार्यवाहक  निखिल तापडिया , प्रशांत कुलकर्णी , सुजाता बच्छाव यांनी दिली.  हा कार्यक्रम महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण  संचालक  डाॅ.विनोद मोहितकर ,पोलीस आयुक्त संदीप कर्णिक
संदीप कर्णिक, अॅडिशनल डायरेक्टर, (इन्व्हेस्टिगेशन) प्राप्तीकर विभाग मारूती मुद्देवाड, सह्याद्री फार्म अध्यक्ष विलास शिंदे , उच्च तंत्रशिक्षण सहसंचालक व प्राचार्य शासकीय तंत्रशिक्षण डाॅ.गोरक्ष  गर्जे या मान्यवरांच्या उपस्थितीत  होणार आहे.
लघु उद्योग भारती नाशिक शाखेतर्फे दरवर्षी इंजिनीयरिंग टॅलेंट सर्च  अशा उपक्रमाचे आयोजन केले जाते. या  स्पर्धेमागील मुख्य उद्देश प्रस्थापित अभियंत्यांच्या औद्योगिक व सामाजिक क्षेत्रातील लक्षणीय योगदानाचे मूल्यमापन करणे आहे. या उपक्रमाचे हे तृतीय वर्ष आहे.
याउपक्रमाअंतर्गत औद्योगिक क्षेत्रातून २०० तर शैक्षणिक क्षेत्रातून ३०० अभियंत्यांनी भाग घेतला. लघु उद्योग भारती नाशिक शाखेच्या तज्ञ समितीच्या देखरेखित या प्रवेशिकांतून औद्योगिक व शैक्षणिक क्षेत्रातून प्रत्येकी २० उत्तम स्पर्धक निवडले गेले. यातून  औद्योगिक क्षेत्रातील तीन व शैक्षणिक क्षेत्रातील तीन सर्वोत्तम स्पर्धकांची घोषणा या कार्यक्रमात होणार आहे. या स्पर्धेतील प्रथम, द्वितीय व तृतीय विजेत्यास रोख रक्कम, ट्रॉफी, सर्टिफिकेट देऊन सत्कार होणार आहे. तसेच उत्तेजनार्थ बक्षिसे ही दिली जाणार आहेत.

Ashvini Pande

अश्विनी पांडे या 2019 पासून पत्रकारितेत कार्यरत असून, सध्या दैनिक गांवकरीत ऑनलाइन कंटेंट क्रीएटर तसेच उपसंपादक म्हणून कार्यरत आहे. त्यांना राजकीय व सामाजिक, सांस्कृतिक विषयाचे सखोल ज्ञान असून, साहित्य संमेलन, राजकीय सभा, राजकारणातील घडामोडी या विषयावर त्यांनी विपुल लेखन केलेलं आहे. विज्ञान शाखे बरोबरच पत्रकारितेतील पदवी बरोबरच साहित्यातील पदव्यूत्तर पदवी त्यांनी प्राप्त केलेली आहे.पत्रकारितेतील योगदानाबद्दल त्यांना विविध सन्मानही प्राप्त झालेले आहेत.

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

14 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

14 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

15 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

15 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

15 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

15 hours ago