21 मिळकतींसाठी एकही खरेदीदार नाही; सातबार्यावर नाव टाकणार
नाशिक : प्रतिनिधी
थकबाकी भरा, अन्यथा मालमत्तांचा लिलाव करू, अशा नोटिसा धाडूनही त्याकडे कानाडोळा करणार्या 73 मिळकतींची पहिल्या टप्प्यातील लिलाव प्रक्रिया बुधवारी (दि.2) पार पडली. नवीन नाशिक व सातपूर विभागीय कार्यालयात पार पडली. मात्र, 21 मिळकतींसाठी कोणीही उत्सुकता दाखवली नाही. परिणामी, महापालिका प्रशासनाचा लिलावाचा पहिलाच दिवस फुसका बार ठरला. मात्र, संतप्त झालेल्या प्रशासनाने एक रुपयात थेट सातबार्यामध्ये नाव टाकून थकबाकीदारांना दणका देणार आहे.
वर्षानुवर्षे मालमत्ताकराची थकबाकी न भरणार्या 439 मिळकतधारकांवर मनपा आयुक्त मनीषा खत्री यांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. पालिका प्रशासनाकडून एकूण 387 थकबाकीदारांच्या मालमत्तांचा लिलाव करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातील पहिल्या टप्प्यातील 72 जणांच्या मालमत्तांचा 2 ते 4 जुलैदरम्यान लिलावाला सुरुवात झाली आहे. उर्वरित मालमत्तांचा लिलाव केला जाणार आहे. नाशिक महापालिकेच्या कर विभागाने वेळोवेळी शहरातील मोठ्या थकबाकीदार मिळकतधारकांना मालमत्ता कर भरणा करण्यासाठी सूचना केल्या होत्या. त्यास प्रतिसाद न दिल्याने मनपाने एकूण 439 मिळकतधारकांवर जप्तीची कारवाई करून लिलाव करण्याचा निर्णय घेतला. मात्र, यातील 50 जणांनी थकबाकी भरण्याची तयारी दाखवल्याने त्यांच्या मालमत्तांच्या होणार्या लिलावाची नामुष्की टळली. उर्वरित 387 जणांनी याकडे दुर्लक्ष केले. प्रशासनाने आक्रमक होत थेट मालमत्तांचा लिलाव करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यानुसार बुधवारपासून मालमत्तांचे लिलाव करण्याचा प्रयत्नही केला. परंतु, या प्रक्रियेत कोणीही रस न दाखवल्याने महापालिकेवर फेरनिविदेची नामुष्की ओढावली आहे. दुसर्या टप्प्यातील 314 मिळकतधारकांचा लिलाव केला जाणार आहे. तत्पूर्वी ज्यांना कारवाई टाळायची असेल, त्यांनी थकबाकी भरावी, असे आवाहन पालिकेच्या कर विभागाने केले आहे.
आज 16 मिळकतींचा लिलाव
सातपूरमधील 9 पैकी 3 व नवीन नाशिकमधील 18 पैकी 3 अशा 6 थकबाकीदारांनी कारवाईच्या भीतीने 6 लाख 55 हजार 78 रुपयांची थकबाकी मंगळवारी सायंकाळी भरली. आज गुरुवारी (दि. 3) नाशिक पूर्व, नाशिक पश्चिममधील 16 मिळकतींचा लिलाव होणार आहे.
21 मिळकतींसाठी लिलाव प्रक्रिया बुधवारी राबवली असता, त्यास काही प्रतिसाद मिळाला नाही. परंतु, मनपा पुन्हा फेरलिलाव करणार आहे. त्यावेळीही कोणीही बोली न लावल्यास संबंधित थकबाकीदारांच्या मिळकतीच्या सातबार्यांमध्ये नाव घातले जाईल.
-अजित निकत, उपायुक्त, कर संकलन विभाग, मनपा
आ. देवयानी फरांदे यांची लक्षवेधी नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेत ठेकेदारीवर नियुक्त करण्यात येणार्या कर्मचार्यांच्या…
आंतरराष्ट्रीय प्लास्टिक पिशवीमुक्त दिन नाशिक ः प्रतिनिधी दोन वर्षांनी सिंहस्थ पर्वणी येत आहे. त्यानिमित्ताने नाशिक…
नाशिक : प्रतिनिधी जिल्ह्यात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे भाजीपाल्याची आवक घटली आहे. सततच्या पावसामुळे भाजीपाला…
दोन संस्थांना प्रशासनाधिकारी डॉ. चौधरींच्या नोटिसा नाशिक : प्रतिनिधी मनपा शाळांमधील विद्यार्थ्यांना दिल्या जाणार्या पोषण…
मनपाच्या तिजोरीत पडणार साडेबारा कोटींची भर, नोंद नसलेल्या मालमत्तांचा शहरात शोध नाशिक : प्रतिनिधी महापालिकेच्या…
सामान्य माणसाने आयुर्वेदाच्या दृष्टीने पावसाळा म्हणजे थोडा आनंद, आणि भरपूर आजारपणाची भीती. पावसाळ्यात वातावरणात ओलावा…