नाशिक

मालमत्ता लिलावाचा फुसका बार

21 मिळकतींसाठी एकही खरेदीदार नाही; सातबार्‍यावर नाव टाकणार

नाशिक : प्रतिनिधी
थकबाकी भरा, अन्यथा मालमत्तांचा लिलाव करू, अशा नोटिसा धाडूनही त्याकडे कानाडोळा करणार्‍या 73 मिळकतींची पहिल्या टप्प्यातील लिलाव प्रक्रिया बुधवारी (दि.2) पार पडली. नवीन नाशिक व सातपूर विभागीय कार्यालयात पार पडली. मात्र, 21 मिळकतींसाठी कोणीही उत्सुकता दाखवली नाही. परिणामी, महापालिका प्रशासनाचा लिलावाचा पहिलाच दिवस फुसका बार ठरला. मात्र, संतप्त झालेल्या प्रशासनाने एक रुपयात थेट सातबार्‍यामध्ये नाव टाकून थकबाकीदारांना दणका देणार आहे.

वर्षानुवर्षे मालमत्ताकराची थकबाकी न भरणार्‍या 439 मिळकतधारकांवर मनपा आयुक्त मनीषा खत्री यांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. पालिका प्रशासनाकडून एकूण 387 थकबाकीदारांच्या मालमत्तांचा लिलाव करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातील पहिल्या टप्प्यातील 72 जणांच्या मालमत्तांचा 2 ते 4 जुलैदरम्यान लिलावाला सुरुवात झाली आहे. उर्वरित मालमत्तांचा लिलाव केला जाणार आहे. नाशिक महापालिकेच्या कर विभागाने वेळोवेळी शहरातील मोठ्या थकबाकीदार मिळकतधारकांना मालमत्ता कर भरणा करण्यासाठी सूचना केल्या होत्या. त्यास प्रतिसाद न दिल्याने मनपाने एकूण 439 मिळकतधारकांवर जप्तीची कारवाई करून लिलाव करण्याचा निर्णय घेतला. मात्र, यातील 50 जणांनी थकबाकी भरण्याची तयारी दाखवल्याने त्यांच्या मालमत्तांच्या होणार्‍या लिलावाची नामुष्की टळली. उर्वरित 387 जणांनी याकडे दुर्लक्ष केले. प्रशासनाने आक्रमक होत थेट मालमत्तांचा लिलाव करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यानुसार बुधवारपासून मालमत्तांचे लिलाव करण्याचा प्रयत्नही केला. परंतु, या प्रक्रियेत कोणीही रस न दाखवल्याने महापालिकेवर फेरनिविदेची नामुष्की ओढावली आहे. दुसर्‍या टप्प्यातील 314 मिळकतधारकांचा लिलाव केला जाणार आहे. तत्पूर्वी ज्यांना कारवाई टाळायची असेल, त्यांनी थकबाकी भरावी, असे आवाहन पालिकेच्या कर विभागाने केले आहे.

आज 16 मिळकतींचा लिलाव

सातपूरमधील 9 पैकी 3 व नवीन नाशिकमधील 18 पैकी 3 अशा 6 थकबाकीदारांनी कारवाईच्या भीतीने 6 लाख 55 हजार 78 रुपयांची थकबाकी मंगळवारी सायंकाळी भरली. आज गुरुवारी (दि. 3) नाशिक पूर्व, नाशिक पश्चिममधील 16 मिळकतींचा लिलाव होणार आहे.

21 मिळकतींसाठी लिलाव प्रक्रिया बुधवारी राबवली असता, त्यास काही प्रतिसाद मिळाला नाही. परंतु, मनपा पुन्हा फेरलिलाव करणार आहे. त्यावेळीही कोणीही बोली न लावल्यास संबंधित थकबाकीदारांच्या मिळकतीच्या सातबार्‍यांमध्ये नाव घातले जाईल.
-अजित निकत, उपायुक्त, कर संकलन विभाग, मनपा

 

 

Editorial Team

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

6 hours ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

6 hours ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

6 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

6 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

6 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

7 hours ago