नाशिक

बंद घरातून सात लाखांचा ऐवज लंपास

सिडको : विशेष प्रतिनिधी
पाथर्डी शिवार परिसरातील पांडववन फ्लॅट येथे बंद घरातून सुमारे 6 लाख 83 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत रंगनाथ अर्जुन मोरे (वय 63, व्यवसाय शेती, रा. बंगला नं. ठ-4, पांडववन फ्लॅट नं. 190/2, गौळाणे, पाथर्डी रोड, पाथर्डी शिवार, नाशिक) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार अज्ञात चोरट्याने त्यांच्या बंद घराच्या बेडरूमचे लोखंडी गज कापून खिडकीची काच फोडून आत प्रवेश केला. त्यानंतर दोन्ही बेडरूममधील लाकडी कपाटांचे दरवाजे तोडून त्यातील सोने-चांदीचे दागिने व रोख रक्कम लंपास केली.
चोरीस गेलेल्या मुद्देमालात सुमारे 2 लाख 98 हजार रुपयांचे 74 ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र, एक लाख रुपयांचा सोन्याचा नेकलेस (25 ग्रॅम), एक लाख 20 हजार रुपयांचे सोन्याचे कडे (30 ग्रॅम), 20 हजार रुपयांचे ब्रेसलेट (5 ग्रॅम), 50 हजार रुपयांच्या दोन सोन्याच्या अंगठ्या (12 ग्रॅम), 6 हजार रुपयांचे झुमके (2.5 ग्रॅम), 4 हजार रुपयांचे कानातील टॉप (2 ग्रॅम), 24 हजार रुपयांची सोन्याची चेन (6 ग्रॅम), एक हजार रुपयांच्या चांदीच्या साखळ्या (5 ग्रॅम), 400 रुपयांची सोन्याची नथ, तसेच 60 हजार रुपये रोख रक्कम (500 रुपयांच्या नोटा) आणि आधार कार्ड, पॅनकार्ड आदी कागदपत्रांचा समावेश आहे. या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, या प्रकरणाचा पुढील तपास इंदिरानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक भूषण सोनार करीत आहेत.

Property worth seven lakhs stolen from a locked house

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

सातपूरला गॅसचा काळाबाजार उघडकीस

पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…

8 hours ago

गुढीपाडव्याच्या निमित्ताने बाजारात उत्साह

मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…

9 hours ago

कचरा करताना कुणीच कचरत नाही…

आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…

9 hours ago

शहरात 12 कोटींचा टीडीआर घोटाळा

स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…

9 hours ago

उन्हाच्या झळांनी धरणांच्या पाणीपातळीत घट

धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…

9 hours ago

चंदुकाका सराफ प्रस्तुत “विवाह तस्मै” कलेक्शन!

पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…

9 hours ago