नाशिक

कुंभमेळा प्राधिकरणाकडून ‘महासिंहस्थ गणेश मंडळ स्पर्धे’चा प्रस्ताव

पाच श्रेणींत दोन लाखांचे पुरस्कार

नाशिक : प्रतिनिधी
महासिंहस्थ कुंभमेळा 2027च्या तयारीला वेग येत असताना गणेशोत्सवाच्या माध्यमातून महासिंहस्थचा संदेश घराघरांत पोहोचविण्याचा उपक्रम नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाने प्रस्तावित केला आहे. ‘महासिंहस्थ गणेश मंडळ स्पर्धे’च्या माध्यमातून गणेश मंडळांना जनजागृती आणि नागरिक सहभागाचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला
जाणार आहे.
यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी शहर व जिल्ह्यातील प्रमुख गणेश मंडळांच्या प्रतिनिधींची बैठक झाली. कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीस नाशिक गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष समीर शेटे, प्राधिकरणाचे अतिरिक्त आयुक्त कमलाकर रणदिवे, तहसीलदार योगेश चंद्रे तसेच गणेश मंडळांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
गणेशोत्सवातील मंडळांची व्यापक पोहोच लक्षात घेऊन महासिंहस्थाचे आध्यात्मिक, सांस्कृतिक, पर्यावरणपूरक आणि आधुनिक स्वरूप नागरिकांपर्यंत नेण्याची संकल्पना मांडण्यात
आली. मंडळांकडून महासिंहस्थविषयक देखावे, सजावट, माहितीपर मांडणी, जनजागृती तसेच सामाजिक उपक्रम राबविता येणार आहेत.
स्पर्धेसाठी कुंभाचे आध्यात्मिक महत्त्व व अमृत, नाशिक-त्र्यंबकेश्वरचा वारसा, भविष्यासाठी सज्ज महासिंहस्थ, हरित व शाश्वत कुंभ, सर्वसमावेशक कुंभ, सेवा व समर्पण आणि नाशिक आध्यात्मिक राजधानी असे सात विषय प्रस्तावित आहेत. विशेष म्हणजे, मोठ्या खर्चापेक्षा कल्पकता, नागरिकांचा सहभाग आणि शाश्वततेला प्राधान्य देण्यात येणार असल्याने लहान मंडळांनाही संधी मिळणार आहे.
मूल्यमापन करताना विषयाशी सुसंगतता, कल्पकता, अंमलबजावणी, नागरिक सहभाग, परिणामकारकता आणि शाश्वतता या बाबींचा विचार केला जाणार आहे. मंडळांच्या सूचनांनंतर स्पर्धेचे अंतिम स्वरूप निश्चित केले जाणार आहे. महासिंहस्थ गणेश मंडळ स्पर्धेसाठी नोंदणीची अंतिम मुदत 10 सप्टेंबर 2026 आहे.

जनजागृतीसोबत नागरिक सहभाग
स्पर्धेच्या माध्यमातून गणेश मंडळांशी संपर्क, मार्गदर्शन सत्रे, महासिंहस्थविषयक माहिती व सर्जनशील साधनसामग्री उपलब्ध करून देणे, तसेच उपक्रमांचे दस्तऐवजीकरण व परीक्षण केले जाणार आहे. युवक, स्थानिक नागरिक आणि विविध सामाजिक घटकांना जोडून महासिंहस्थाचा संदेश नाशिकच्या प्रत्येक परिसरापर्यंत पोहोचविण्याचा प्राधिकरणाचा प्रयत्न आहे. खर्चिक सजावटीपेक्षा कल्पना, सहभाग आणि पर्यावरणपूरक उपक्रमांना महत्त्व देण्यात येणार आहे.

पाच श्रेणींत पुरस्कार
सर्वोत्कृष्ट कुंभविषयक गणेशोत्सव सजावट
सर्वोत्कृष्ट आध्यात्मिक मांडणी
सर्वोत्कृष्ट शाश्वत गणेश मंडळ
सर्वोत्कृष्ट तंत्रज्ञान व नवोपक्रम सादरीकरण
सर्वोत्कृष्ट सामुदायिक सहभाग उपक्रम

प्रत्येक श्रेणीसाठी दोन लाख रुपयांचे पारितोषिक, तर नावीन्यपूर्ण संकल्पनेसाठी परीक्षक मंडळाचा पाच लाख रुपयांचा विशेष पुरस्कार प्रस्तावित आहे.

Proposal for the ‘Mahasimhastha Ganesh Mandal Competition’ from the Kumbh Mela Authority.

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

13 hours ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

13 hours ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

13 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

13 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

13 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

13 hours ago