उर्वरित सव्वाशे कोटींच्या कामांना मात्र हिरवा कंदील
नाशिक : प्रतिनिधी
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टीने महापालिका प्रशासनाने काही दिवसांपूर्वी शहरात कोणत्या ठिकाणी नव्याने पूल उभारणे आवश्यक आहे. याकरिता नियोजन केले असता सहा ठिकाणी पूल उभारणे आवश्यक असल्याने त्यासाठी नियोजन करण्यात आले होते. बांधकाम विभागाने सोमवारी (दि.17) या पुलांच्या कामाची निविदा प्रसिद्ध केली. दरम्यान, या सहा पुलांतून सिंहस्थ कुंभमेळ्यात भाविकांच्या द़ृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असणार्या रामवाडी येथील घारपुरे घाट येथे 24 कोटी 91 लाख खर्चून पूल उभारला जाणार होता. परंतु या पुलावर अनपेक्षितपणे फुली मारण्यात आली आहे. त्यामुळे या पुलाच्या कामावर कात्री मारण्याचाा हेतू काय? अशी चर्चा महापालिका वर्तुळात होत आहे.
सिंहस्थ काही महिन्यांवर असतानाही शासनाकडून याकडे दुर्लक्ष होत असल्याची ओरड सुरु होती. दरम्यान, काही दिवसांपूर्वी शासनाने पंधरा महिन्यांपेक्षा जास्त कालावधी लागणार्या कामाचे नियोजन सुरू केले होते. त्यानुसार अशा कामांची यादी तयार करुन तत्काळ ते सुरू करण्यात येणार आहे. मनपाला मार्च 2026 मध्ये 2,368 कोटींचा निधी विविध कामांसाठी दिला जाणार आहे. दरम्यान मनपाच्या बांधकाम विभागाने यापूर्वीच सिंहस्थात भाविकांच्या सुरक्षेच्या द़ृष्टीने महत्त्वाच्या सहा पुलांच्या उभारणीची निविदा प्रक्रिया सुरू केली होती. परंतु निधीअभावी हे काम मागे पडले होते. मात्र निधी उपलब्ध होणार असल्याने सोमवारी या पुलांच्या कामासाठी निविदा प्रसिद्ध केली गेली. परंतु रामवाडी परिसरातील पूलाचे काम सध्यास्थित थांबवण्यात आले आहे. यामुळे मात्र विविध प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले
आहे.
भाविकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य असतानाही या पुलाचे काम निविदेतून का वगळले, असा सवाल उपस्थित होतो आहे. गोदावरी, नंदिनी व वालदेवी, वाघाडीसह एकूण सहा पूल बांधण्याचे नियोजन केले होते. सिंहस्थात दहा कोटी भाविक शहरात येण्याचा अंदाज आहे. सुरक्षेच्या उपाययोजना म्हणून बांधकाम विभागाने 37 पुलांच्या स्ट्रक्चर ऑडिट सुरू केले आहे. यासोबतच सिंहस्थ काळात वाहतूक कोंडी न होता, भाविकांना शहराच्या चारही बाजूंनी बाहेर पडता यावे. याकरिता पुलांचे ऑडिट करण्याबरोबरच 137 कोटींचे समांतर पूल उभारले जाणार आहेत. परंतु नियोजित कामातून रामवाडीतील पुलाचे काम वगळल्याने 110 कोटींचा खर्च येणार आहे. एकीकडे भाविकांच्या सुरक्षेला प्राधान्य म्हणायचे अन दुसरीकडे महत्त्वाचे काम रद्द करायचे, असा काहीसा प्रकार मनपात सुरू असल्याचे चित्र आहे.
प्रस्तावित पूल त्यासाठीचा खर्च
1) तपोवन पूल- 35 कोटी 89 लाख 60 हजार 886
2) रामवाडी ते घारपुरे घाट- 24 कोटी 91 लाख 98 हजार 805 (काम वगळले)
3) लक्ष्मीनारायण मंदिराजवळ – 20 कोटी 96 लाख 96 हजार 244
4) नंदिनी नदी मिलिंदनगर पूल- 19 कोटी 23 लाख 6 हजार
5) वालदेवी नदीवरील वडनेर दुमाला पूल- 16 कोटी 82 लाख 60 हजार
6) गाडगे महाराज पूल- 11 कोटी 35 लाख 11 हजार
चांदवड, सुरगाणा, मालेगाव तालुक्यात प्रत्येकी एका गटाने वाढ, संख्या 74 वर नाशिक : प्रतिनिधी जिल्हा…
कुपोषित बालकांच्या आरोग्य संवर्धनासाठी जिल्हा परिषदेचा उपक्रम नाशिक : प्रतिनिधी जिल्हा परिषदेच्या पोषणदूत उपक्रमांतर्गत अंतर्गत…
रात्रीच्या वेळी घरांच्या कड्या वाजवून दहशत माडसांगवी : वार्ताहर लाखलगावसह परिसरात चोरांच्या दहशतीमुळे लाखलगावचे ग्रामस्थ…
लग्न न करता एकत्र राहण्याचे (लिव्ह इन रिलेशनशिप) फॅड अलीकडे खूप वाढले आहे. विशेषतः शहरात…
नाशिक ः काल शेवटच्या श्रावणी सोमवारी रिमझिम पावसातदेखील जवळपास लाखभर शिवभक्तांनी श्री कपालेश्वराच्या दर्शनासाठी गर्दी…
रहिवाशांमध्ये समाधान; नववसाहतींच्या विकासाला मिळाली नवी दिशा विंचूर : प्रतिनिधी विंचूरच्या मध्यवर्ती तीन पाटीपासून हाकेच्या…