नाशिक

मालेगाव पॉवर सप्लाय कंपनीविरोधात आंदोलन

पाणीपुरवठ्यावेळी वीज खंडित, अवाजवी बिलांमुळे नागरिक त्रस्त

मालेगाव : प्रतिनिधी
शहरात कार्यरत मालेगाव पॉवर सप्लाय कंपनी या खासगी वीज वितरण कंपनीविरोधात भाजपा शहराध्यक्ष देवा पाटील यांच्या नेतृत्वात धरणे आंदोलन करण्यात आले.
शहरात पाणीपुरवठ्यावेळी वीज खंडित होत असल्याने नागरिकांना पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहावे लागते. मनपा पाणीपुरवठा विभाग व वीज वितरण कंपनीचे अधिकार्‍यांचा एकमेकांशी संवाद नसल्याने जनतेला पाणी समस्याला सामोरे जावे लागते. खासगी वीज कंपनी अधिकारी सर्वसामान्य नागरिकांना उडवाउडवीची उत्तरे देतात. तसेच अवाजवी वीजबिल आदी समस्यांचे निवारण होण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले. कंपनीविरोधात हे पहिले आंदोलन असून, आता जर कंपनीने वेळीच सुधारणा केली नाही, तर कंपनी अधिकार्‍यांना रस्त्यावर फिरू दिले जाणार नाही, अशा इशारा आंदोलकांनी दिला.
यावेळी हरिप्रसाद गुप्ता, कमलेश निकम, लकी गिल, जगदीश गोर्‍हे, रवीश मारू, देवा पाटील, रजिया शेख, कल्पना पाटील, सुरेखा भुसे आदींची भाषणे झाली. आंदोलनास नंदूतात्या बच्छाव, धनंजय पवार, पोपटराव लोंढे, संदीप भुसे, शरद पानपाटील, डॉ. जयदीप पवार, ज्ञानेश्वर पवार, दत्तू आहिरे, अरुण पाटील, गणेश मोरे, सागर खरे, मनोहर जाधव, दुर्गेश सूर्यवंशी, मिलिंद भालेराव, राजेंद्र गायवाड, सुधीर जाधव, रवींद्र वडनेरे, भाग्येश वैध, सुरेंद्र पहाडे, राजू पाटील, पद्माकर पवार, कल्पना पाटील, अकबर शहा, नाना मराठे, निंबा निकम, बाळासाहेब सावकार, सतीश उपाध्याय, नरेंद्र छाजेड, रवींद्र सूर्यवंशी, भाग्येश कासार, नूर खान, विजय कवाड आदी उपस्थित होते.

या आहेत मागण्या
पाणीपुरवठा वेळेस वीज खंडित करू नये, सर्वसाधारण नागरिकांना सहज तक्रार नोंदवता येईल, अशी संपर्क प्रणाली उपलब्ध करावी, स्थानिक युवकांना रोजगारात प्राधान्य द्यावे, मनपा पाणी व वीजपुरवठा तांत्रिक विभागाने एकमेकांशी संवाद करून संगमताने नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी खबरदारी घ्यावी आदी मागण्यांचे निवेदन कंपनी अधिकारी रमेश खरात यांना देण्यात आले.

 

Editorial Team

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

6 hours ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

6 hours ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

6 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

6 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

7 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

7 hours ago