नाशिक

गॅस सिलिंडर वाहनांना सुरक्षा द्या

राज्य सरकारच्या सर्व जिल्हाधिकार्‍यांना सूचना

मुंबई : अमेरिका-इस्राईल आणि इराण युद्धाच्या पाश्वर्र्भूमीवर निर्माण झालेल्या घरगुती व व्यावसायिक वापराच्या गॅस सिलिंडरच्या सुरळीत पुरवठ्याबाबत राज्य शासन विविध उपाययोजना करीत आहे. गॅस सिलिंडर नेणार्‍या वाहनांना पोलिसांचे सुरक्षा देण्यासह कंट्रोल रूम बनविण्याच्या सूचना राज्य सरकारने सर्व जिल्हाधिकार्‍यांना दिल्या आहेत. घरगुती एलपीजी सिलिंडरच्या पुरवठ्यात अडथळे निर्माण होऊ नयेत आणि संभाव्य टंचाईच्या परिस्थितीत समन्वय साधता यावा, यासाठी राज्य शासनाने जिल्हास्तरावर विशेष समित्या स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.

घरगुती एलपीजीचा तुटवडा नाही

राज्यात दररोज सरासरी सुमारे 9000 टन एलपीजीची मागणी असते. ही मागणी पूर्ण करण्यासाठी रिफायनरीमधील एलपीजी उत्पादन वाढविण्यात आले असून, गेल्या दोन दिवसांत दैनिक उत्पादन 9000 मेट्रिक टनांवरून 11,000 मेट्रिक टनांपर्यंत वाढविण्यात आले आहे. त्यामुळे राज्यात घरगुती एलपीजीचा कोणताही तुटवडा नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. घरगुती गॅसचीमागणी पूर्ण करण्याइतके पुरेसे उत्पादन आणि साठा उपलब्ध आहे. व्यावसायिक एलपीजीच्या बाबतीत केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार प्राधान्यक्रम निश्चित करण्यात आले आहेत. घरगुती वापरासाठीच्या पाइप्ड नॅचरल गॅस (पीएनजी) चादेखील पुरेसा साठा उपलब्ध आहे. तसेच दररोज सुमारे 15,000 किलोलिटर पेट्रोल आणि 38,000 किलोलिटर डिझेल या मागणीची पूर्तता केली जात आहे.

Provide security to gas cylinder vehicles

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

सातपूरला गॅसचा काळाबाजार उघडकीस

पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…

5 hours ago

गुढीपाडव्याच्या निमित्ताने बाजारात उत्साह

मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…

5 hours ago

कचरा करताना कुणीच कचरत नाही…

आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…

6 hours ago

शहरात 12 कोटींचा टीडीआर घोटाळा

स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…

6 hours ago

उन्हाच्या झळांनी धरणांच्या पाणीपातळीत घट

धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…

6 hours ago

चंदुकाका सराफ प्रस्तुत “विवाह तस्मै” कलेक्शन!

पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…

6 hours ago