राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय

मासिक पाळी रजांमुळे समाजात नकारात्मक संदेश

सुनावणीस कोर्टाचा नकार; नोकर्‍यांवर परिणामाची भीती

नवी दिल्ली : महिला कर्मचारी आणि विद्यार्थिनींसाठी मासिक पाळीच्या काळात सशुल्क सुट्टी देण्याची देशव्यापी धोरण तयार करण्याची मागणी करणार्‍या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी करण्यास नकार दिला आहे. अशी सुट्टी कायद्याने अनिवार्य केल्यास कंपन्या महिलांना नोकरी देण्यास टाळाटाळ करू शकतात, अशी भीतीही न्यायालयाने व्यक्त केली. काल यासंदर्भात झालेल्या सुनावणीत न्यायालयाने अशा प्रकारची रजा देणे उचित नसल्याचे स्पष्ट केले.
महिलांसाठी ‘मेनस्ट्रुअल लीव्ह’ देण्याबाबत धोरण तयार करण्याची मागणी सुप्रीम कोर्टात करण्यात आली होती. मात्र न्यायालयाने या विषयावर थेट हस्तक्षेप करण्यास नकार देत संबंधित विभागांनी सर्व भागधारकांशी चर्चा करून धोरणाचा विचार करावा, असे मत व्यक्त केले. याचिकाकर्त्यांचे वकील वरिष्ठ अधिवक्ता एम. आर. शमशाद यांनी सुनावणीदरम्यान सांगितले की, केरळसारख्या काही राज्यांमध्ये विद्यार्थिनींसाठी मासिक पाळीच्या सुट्टीसंदर्भात सवलती देण्यात आल्या आहेत. तसेच काही खासगी कंपन्यांनीही स्वेच्छेने महिलांना अशी सुट्टी देण्याची सुविधा सुरू केली आहे. यावर प्रतिक्रिया देताना सरन्यायाधीशांनी सांगितले की, कंपन्यांनी स्वेच्छेने अशी सुविधा देणे स्वागतार्ह आहे. मात्र, ती कायद्याने अनिवार्य केली तर नियोक्ते महिलांना नोकरी देण्यास टाळतील आणि त्यामुळे त्यांच्या करिअरवरही परिणाम होऊ शकतो.

भीती निर्माण करण्यासाठी याचिका दाखल?
सरन्यायाधीश सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची यांच्या खंडपीठाने निरीक्षण नोंदवलं की, अशा प्रकारच्या काही याचिका समाजात भीती निर्माण करतात. यामुळे महिलांना कमी लेखलं जातं आणि मासिक पाळी ही महिलांसाठी काहीतरी नकारात्मक किंवा त्रासदायक बाब असल्याचा संदेश दिला जातो.
समाजावर होऊ शकतात नकारात्मक परिणाम
सुप्रीम कोर्टाने असेही नमूद केलं की, पीरियड्स लीव्ह हा सकारात्मक अधिकार असू शकतो, मात्र कंपन्यांच्या दृष्टीने सशुल्क सुट्टी देण्याची जबाबदारी विचारात घेतली पाहिजे. अशा प्रकारची सक्ती केली तर त्याचे समाजावर आणि रोजगाराच्या संधींवर नकारात्मक परिणाम होऊ शकतात.

Negative messages in society due to menstrual leave

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

स्वच्छता ही सेवा अभियानात सात टन कचरा संकलित

पालकमंत्री महाजनांसह महापौर आडके मोहिमेत सहभागी नाशिक : प्रतिनिधी स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत विशेष स्वच्छता…

7 hours ago

रिंगरोडबाधित शेतकर्‍यांचा प्रशासनावर संताप

तीन तास पालकमंत्र्यांची प्रतीक्षा; भूसंपादन दरावरून आक्रमक भूमिका नाशिक : प्रतिनिधी रिंगरोड भूसंपादनामुळे बाधित शेतकरी…

7 hours ago

‘अग्निशमन’च्या वाहनांना जीपीएस यंत्रणा

ई-फायर सॉफ्टवेअरची अंमलबजावणी नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेच्या अग्निशमन विभागातील सर्व सेवांचे डिजिटायझेशनचे काम केले…

7 hours ago

संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत घुमणार खा. वाजेंचा आवाज

अमेरिकेत करणार देशाचे प्रतिनिधित्व, राज्यातून एकमेव खासदार नाशिक : प्रतिनिधी नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजाभाऊ…

7 hours ago

इगतपुरी शहरात स्वच्छतेसह 500 रोपांची लागवड

महात्मा गांधी जयंतीनिमित्त नगरपालिकेतर्फे सेवा संकल्प अभियान इगतपुरी : प्रतिनिधी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त…

7 hours ago

पावसाचा खंड, अघोषित भारनियमन अन् कमी दाब

विहिरीत पाणी असूनही विजेविना पिके करपण्याच्या मार्गावर दिक्षी : वार्ताहर पावसाने दीर्घ खंड दिल्याने खरीप…

8 hours ago