नाशिक

संविधान सन्मानासाठी ‘जनआक्रोश’

नाशिकरोड ते शालिमार पायी महामोर्चा

नाशिकरोड : विशेष प्रतिनिधी
प्रजासत्ताकदिनी ध्वजारोहणानंतर झालेल्या भाषणात राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा उल्लेख न केल्याच्या निषेधार्थ नाशिकमध्ये भव्य जनआक्रोश महामोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.

‘आम्ही भारताचे लोक, नाशिककर’ या माध्यमातून आयोजित करण्यात आलेला हा विराट पायी महामोर्चा नाशिकरोड येथून शालिमारपर्यंत काढण्यात आला.
प्रजासत्ताकदिनी पालकमंत्री गिरीश महाजन यांनी केलेल्या भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव जाणीवपूर्वक टाळल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. याच कार्यक्रमात बंदोबस्ताकामी उपस्थित असलेल्या वनविभागाच्या महिला कर्मचारी माधवी जाधव यांनी कोणतीही भीड न बाळगता यावर जाहीर प्रश्न उपस्थित केला होता. त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत राज्यभरात पोहोचला.
या घटनेनंतर भीम अनुयायांसह विविध विरोधी पक्षांनी मंत्री गिरीश महाजन यांच्या भूमिकेचा तीव्र निषेध व्यक्त केला.
या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेला हा महामोर्चा दोन तास उशिराने सुरू झाला. नाशिकरोड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादन करून महामोर्चाला सुरुवात झाली. त्यानंतर हा मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, बिटको चौकमार्गे शालिमार येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापर्यंत पोहोचला. सुमारे सहा ते सात तास चाललेल्या या पायी महामोर्चाने संपूर्ण शहराचे लक्ष
वेधून घेतले.
मोर्चात डॉ. बाबासाहेब आंबेडकर संविधानाच्या प्रतिमेसमोर उभे असल्याचा आकर्षक चित्ररथ विशेष लक्षवेधी ठरला. अनेक महिलांनी महात्मा जोेतिबा फुले, सावित्रीबाई फुले, माता रमाई, मौलाना आझाद, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे, अहिल्याबाई होळकर आदींचे चित्रफलक हातात घेतले होते.
संविधान के सन्मान में, हर भारतीय मैदान में, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो, छत्रपती शिवाजी महाराज की जय, अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. पंचरत्न ध्वजासह भगवे व निळे झेंडे मोर्चाच्या विराटतेची साक्ष देत होते.
जलसाकार महिला व मुलींनी सादर केलेल्या सामाजिक, राजकीय व प्रबोधनात्मक गीतांना
मोर्चेकर्‍यांकडून मोठी दाद मिळाली. तीव्र उन्हाची तमा न बाळगता महिला, पुरुष, आबालवृद्ध मोठ्या संख्येने या महामोर्चात सहभागी झाले होते. विविध सामाजिक संघटना व राजकीय पक्षांच्या पदाधिकार्‍यांनी
मोर्चेकर्‍यांना पाण्याच्या बाटल्यांचे
वितरण केले.
या महामोर्चात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), शिवसेना (शिंदे गट) यांसह विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी सहभागी होऊन महामोर्चास पाठिंबा दर्शवित होते.
महामोर्चाचा समारोप शालिमार येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ करण्यात आला. त्यानंतर पाच महिला व युवतींच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन निवेदन सादर केले.

वाहतुकीचे तीन तेरा…

नाशिकरोड येथून शालिमारकडे निघालेल्या जनआक्रोश महामोर्चामध्ये प्रचंड महिला व पुरुष सहभागी झाल्याने रस्त्यावर मोठ्या प्रमाणात गर्दी निर्माण झाली होती. या विराट गर्दीचा फटका दैनंदिन चालणार्‍या वाहनचालकांवर झाला. अनेक ठिकाणी वाहतूक खोळंबल्यामुळे वाहतुकीचे तीन तेरा वाजले. पोलिसांना वाहतूक सुरळीत करण्यासाठी मोठे परिश्रम घ्यावे लागले.

पोलिसांचा चोख बंदोबस्त

मंत्री गिरीश महाजन यांनी प्रजासत्ताकदिनी भाषणामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेख न केल्याने त्याच्या निषेधार्थ आयोजित केलेल्या जनआक्रोश महामोर्चाला नाशिकरोडपासूनच विराट स्वरूप निर्माण झाले होते. कायदा व सुव्यवस्था बाधित होऊ नये यासाठी पोलीस उपायुक्त किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली तीन सहाय्यक पोलीस आयुक्त, आठ वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक, 15 पोलीस उपनिरीक्षक व 250 पेक्षा अधिक पोलीस अधिकारी-कर्मचारी, महिला बंदोबस्ताकामी लावण्यात आले होते.

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

सातपूरला गॅसचा काळाबाजार उघडकीस

पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…

9 hours ago

गुढीपाडव्याच्या निमित्ताने बाजारात उत्साह

मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…

9 hours ago

कचरा करताना कुणीच कचरत नाही…

आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…

9 hours ago

शहरात 12 कोटींचा टीडीआर घोटाळा

स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…

9 hours ago

उन्हाच्या झळांनी धरणांच्या पाणीपातळीत घट

धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…

10 hours ago

चंदुकाका सराफ प्रस्तुत “विवाह तस्मै” कलेक्शन!

पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…

10 hours ago