लासलगाव ते विंचूर रस्ता दुरुस्तीबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग सुस्त

 

भुजबळांच्या आदेशाला केराची टोपली

लासलगाव: समीर पठाण

लासलगाव ते विंचूर या ५ किलोमीटर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अपघात होऊन अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत याच पार्श्वभूमीवर गेल्या आठवड्यात मतदार संघाचे आमदार माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी लासलगाव शहरात या संदर्भात आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना सूचना देऊन या रस्त्याच्या दोन्ही बाजूला साईड पट्ट्या करण्याचे सूचना दिल्या होत्या मात्र भुजबळांची पाठ फिरल्यानंतर अधिकाऱ्यांनी याकडे कानाडोळा करत भुजबळांच्या आदेशाला एक प्रकारे वाटाण्याच्या अक्षता दाखविल्याचे आता नागरिकांमध्ये चर्चा होत आहे.

आशिया खंडातील नावाजलेली बाजारपेठ म्हणून ओळख असलेल्या लासलगाव शहरापासून नाशिक औरंगाबाद महामार्ग कडे जाणाऱ्या विंचूर येथे जाण्यासाठी ५ किलोमीटर प्रवास करावा लागतो मात्र हा ५ किलोमीटरचा प्रवास अनेकांच्या जीवावर बेतत आहे.या रस्त्यावरील मंजुळा मंगल कार्यालयात समोर असलेल्या वळणावर दर आठवड्याला एक ते दोन अपघात होऊन अनेकांना आपले जीव गमवावे लागले आहे. अपघातांमध्ये सर्वात जास्त दुचाकीचे प्रमाण अधिक आहे.

छगन भुजबळ यांनी लासलगाव शहरात आढावा बैठकीत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना या संदर्भात सूचना करून तातडीने रस्त्याच्या दोन्ही बाजूला साईड पट्ट्या भरण्याचे सूचना केल्या होत्या.ठिकठिकाणी फलक लावण्याचे सांगण्यात आले होते त्यावेळी अधिकाऱ्यांनी देखील तातडीने काम करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र सरकारी काम आणि चार महिने थांब याची अनुभूती थेट माजी उपमुख्यमंत्र्यांना देखील येताना दिसत आहे.

बैठकीच्या दुसऱ्या दिवशी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी तत्परता दाखवत रस्त्याच्या बाजूची वाढलेली झाडे व गवत काढून थोडाफार रस्ता सुधरवण्याचा प्रयत्न केला.मात्र तरीही अपघात घडण्याचे प्रमाण जैसे थे आहे. त्यामुळे केवळ रस्ता दुरुस्तीचा देखावा न करता तातडीने रस्त्याच्या दोन्ही बाजूला साईड पट्ट्या भरून रस्ता मोठा करण्याची गरज असल्याचे मत अनेक त्रस्त वाहन चालक करत आहे.

१———-चौकट ——–

अपघाती जागेचे फलक लावण्याची गरज…

लासलगाव विंचूर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अपघात होत असल्याने या रस्त्यावर फलक लावून जनजागृती करणे गरजेचे आहे मंजुळा मंगल कार्यालयाच्या बाहेर वळण रस्ता असल्याने या ठिकाणी गतिरोधक बसविण्याची मागणी अनेक दिवसांपासून वाहनचालकांकडून केली जात आहे मात्र त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.

पोलिसांनी तत्परता दाखवत फलक केला मोकळा…

विंचूर लासलगाव विंचूर रस्त्यावर अपघात नेहमीचेच झाल्याने सर्वात जास्त डोकेदुखी पोलिसांसाठी ठरत असल्याने पोलीस प्रशासन देखील हतबल झाले आहे यापूर्वी वळण रस्त्याजवळ रेडियम फलक या ठिकाणी लावलेले होते.मात्र त्यावर झाडांचा वेल मोठ्या प्रमाणात वाढल्याने तो फलक झाकला गेला होता. सहायक पोलीस निरीक्षक राहुल वाघ व पोलिसांनी या ठिकाणी जात तो वेल काढून एकमेव फलक मोकळा केला.

भागवत उदावन्त Admin

भागवत उदावंत हे गेल्या 25 वर्षापासून पत्रकारितेत असून, विविध दैनिकांत उपसंपादक, वरिष्ठ उपसंपादक म्हणून काम केलेले आहे. गांवकरीत सध्या वृत्तसंपादक या पदावर कार्यरत आहेत. ऑनलाइन व डिजिटल पत्रकारिता बरोबरच राजकीय विषयावर विपुल लेखन केलेलं आहे. पत्रकारितेतील मास्टर पदवी त्यांनी मिळवलेली आहे.

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

16 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

16 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

16 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

16 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

17 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

17 hours ago