महाराष्ट्र

भरड धान्यांची माहिती देतांना लिहिलं पुस्तकं मिलेट्स किचन पुस्तकाचे जिल्हाधिकारी यांच्या हस्ते प्रकाशन

भरड धान्यांची माहिती देतांना लिहिलं पुस्तक
मिलेट्स किचन पुस्तकाचे जिल्हाधिकारी यांच्या हस्ते प्रकाशन

नाशिक : प्रतिनिधी

शेती हा फक्त व्यवसाय नाही.. ती जगण्याची रीत आहे..
या नुसार गेल्या ११ वर्षांपासून आडगाव चोथवा,ता येवला येथे कृषी सहायक म्हणून काम करत असलेल्या सोनाली कदम यांचे प्रयत्न वाखाणण्याजोगं आहे.शेतकरी कुटुंबात जन्म झालेला असल्यामुळे पहिल्यापासून शेती मातीशी निगडित. २०२३ हे वर्ष पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून साजरे केले गेले.त्यालाच भरड धान्य किंवा श्री धान्य म्हणून ही ओळखले जातेय. भारतात कोरडवाहू क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर तृणधान्य ची लागवड केली जात होती,परंतु बदलत्या पीक पध्दतीने त्यात घट होत गेली.महाराष्ट्र शासनाच्या वतीने आहारातील महत्व यांची जनजागृती व्हावी मिशन मिलेट ही मोहीम राबवली गेली.आहार तज्ज्ञ नियमितपणे सांगता तृणधान्य चा आहारात वापर करा पण त्या संबंधी नवनवीन पाककृती गृहिणी विचारायच्या मगं तिथूनच मिलेट्स किचन या पुस्तकाची कल्पना सुचली.
ग्रामीण भागात माहिती देत सोनाली शेळके कदम यांनी याबद्दल पाककृती स्पर्धा घेत जनजागृती करण्याचा प्रयत्न केलाय.तृणधान्य म्हणजे मिलेट्स वर इंग्रजी हिंदी माध्यमातून अनेक पुस्तके लिहिली गेली,परंतु सोनाली कदम शेळके यांनी प्रथमच मराठी माध्यमातून “मिलेट्स किचन” हे पुस्तक लिहिलं असून निश्चितच खाद्य प्रेमींना हे पुस्तक आवडेल अशी खात्री वाटते.यात अतिशय सोप्या भाषेत पौष्टिक तृणधान्ये महत्व आणि आरोग्यास लाभदायक पदार्थांच्या पाककृती देण्याचा प्रयत्न केलाय.या पुस्तकासाठी श्री दिलीप झेंडे संचालक (कृषि विस्तार व प्रशिक्षण) कृषि आयुक्तालय पुणे यांनी शुभेच्छा दिल्या.   जिल्हाधिकारी कार्यालय,नाशिक येथे कृषि विभागाच्या वतीने आयोजित केलेल्या खरीप हंगाम पुर्व आढावा सभेत आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षानिमित्त “मिलेट्स किचन” या पुस्तकाचे प्रकाशन  जिल्हाधिकारी जलज शर्मा
,अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अर्जुन गुंडे,नाशिक विभागिय कृषि सहसंचालक मोहन वाघ, जिल्हा कृषी अधीक्षक विवेक सोनवणे,.आत्मा प्रकल्प संचालक राजेंद्र निकम,
कृषी उपसंचालक जगदिश पाटील, शुभम बेरड तालुका कृषि अधिकारी, येवला तसेच नाशिक जिल्ह्यातील सर्व कृषि अधिकारी कृषि शास्त्रज्ञ उपस्थित होते.

 

कृषिसाहायक म्हणून काम करताना पौष्टिक तृणधान्यांची माहिती देत असताना तृणधान्य पाककृतींचा अभाव शेतकरी महीलांनी बोलून दाखवला.यामुळे मराठी मध्ये “मिलेट्स किचन” च्या माध्यमातून सोप्या पाककृती व महत्त्व उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला आहे.
सोनाली कदम शेळके
कृषी सहाय्यक
आडगाव चोथवा
येवला

 

Bhagwat Udavant

Recent Posts

गोदावरीचे गटारीकरण तात्काळ थांबवा गोदावरी जतन व संवर्धन संघर्ष समितीचे निवेदन

गोदावरीचे गटारीकरण तात्काळ थांबवा गोदावरी जतन व संवर्धन संघर्ष समितीचे निवेदन नाशिक : प्रतिनिधी गोदावरीचे…

8 hours ago

‘एसएमबीटी’त घडत आहेत संशोधक

नाशिक : प्रतिनिधी एसएमबीटी मेडिकल सायन्सेस अ‍ॅण्ड रिसर्च सेंटर, एसएमबीटी डेंटल कॉलेज संगमनेर, एसएमबीटी इन्स्टिट्यूट…

11 hours ago

कुंभमेळा कक्षाची स्थापना, पण कर्मचार्‍यांची वानवा

नाशिक : प्रतिनिधी जिल्हाधिकारी कार्यालयात कुंभमेळा कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. उपजिल्हाधिकारी भूसंपादन अधिकारी रवींद्र…

11 hours ago

कांद्याचे निर्यात शुल्क कमी होऊनही दरात घसरण, शेतकर्‍यांत चिंता

कांद्याचे निर्यात शुल्क कमी होऊनही दरात घसरण, शेतकर्‍यांत चिंता सिन्नर : प्रतिनिधी केंद्र शासनाने कांद्यावरील…

11 hours ago

कांद्याचे निर्यात शुल्क कमी होऊनही दरात घसरण, शेतकर्‍यांत चिंता

कांद्याचे निर्यात शुल्क कमी होऊनही दरात घसरण, शेतकर्‍यांत चिंता सिन्नर : प्रतिनिधी केंद्र शासनाने कांद्यावरील…

11 hours ago

अवघ्या एक रुपयासाठी गमावले प्राण, नेमकी काय घडली घटना?

सिडको : विशेष प्रतिनिधी दहा रुपयाचे सिगारेट 11 रुपयाला का विकतो, याचा जाब विचारल्याने टपरी…

1 day ago