कोळगाव येथे अवैध दारूविक्री अड्ड्यावर छापा
लासलगाव प्रतिनिधी
निफाड तालुक्यातील कोळगाव येथे अवैध दारूची विक्री करणाऱ्या अड्ड्यावर पोलीसांनी छापा टाकून मुद्देमाल हस्तगत केला असून विनापरवाना अवैध रित्या देशी,विदेशी दारू विक्री करणाऱ्या महिलेच्या विरोधात लासलगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती स पो नि राहुल वाघ यांनी दिली आहे.या कारवाईत सुमारे सात हजार रुपयांचा देशी विदेशी दारूचा साठा पोलिसांच्या हाती लागला आहे.पुष्पा रामदास मोरे (४७) राजवाडा कोळगाव ता निफाड असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित मद्यविक्री करणाऱ्या महिलांचे नाव आहे.
जिल्ह्यातील अवैध धंदे रोखण्यासाठी पोलिस अधिक्षक शहाजी उमाप यांनी विभागनिहाय आठ स्वतंत्र भरारी पथकांची नियुक्ती केली आहे या पथकांच्या माध्यमातून जिल्हाभर छापा सत्र सुरू आहे.नाशिक विभागाचे उपनिरीक्षक मनोज वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या पथकाला खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे कोळगाव येथे सदर छापा टाकून कारवाई करण्यात आली आहे.
कांदा उत्पादकांवर ओढवणार आर्थिक संकट कांद्याचे भाव गडगडणार लासलगाव :- समीर पठाण गेल्या काही दिवसांपासून…
यापूर्वीच्या दोन समित्यांच्या अहवालाचे काय झाले? कांदा संघटनेने अध्यक्ष भारत दिघोळे यांचा सरकारला सवाल नाशिक:…
वधूचा घागरा बदलून न दिल्याने नियोजित वराने केले असे काही.... शहापूर : साजिद शेख…
मृत्यू नंतरही आदिवासींच्या नशिबी पुन्हा मरण यातनाच मोखाडा: नामदेव ठोंमरे मोखाडा तालुक्याचे शेवटचे टोक असलेल्या…
सेवा शक्ती संघर्ष एस.टी. कर्मचारी संघाच्या वर्धापन दिनानिमित्त आज राज्यस्तरीय भव्य अधिवेशन नाशिक प्रतिनिधी सेवा…
नाशिक : प्रतिनिधी श्रावण महिन्यातील पहिला, दुसरा व चौथा श्रावणी सोमवार अनुक्रमे 28 जुलै, 4…