चार जण अटकेत; 500 ते 600 किलो गोमांस, तीन दुचाकी, चारचाकी वाहन जप्त
सिडको : विशेष प्रतिनिधी
मुंबई महामार्गालगत असलेल्या राजीवनगर झोपडपट्टी परिसरात अवैधरीत्या गायींची कत्तल करून गोमांस विक्री केली जात असल्याची माहिती बजरंग दल, विश्व हिंदू परिषद आणि गोरक्षक दलाच्या कार्यकर्त्यांना मिळाली. त्यानुसार सुमारे 50 ते 60 कार्यकर्त्यांनी संबंधित ठिकाणी छापा टाकून सुरू असलेला कत्तलखाना उघडकीस आणला.
या कारवाईदरम्यान विक्रीसाठी ठेवलेले अंदाजे 500 ते 600 किलो गोमांस, तीन दुचाकी, एक चारचाकी वाहन तसेच इतर साहित्य जप्त करण्यात आले. जप्त केलेले साहित्य इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले. या प्रकरणी कत्तलखाना चालकासह इतर चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, चार जणांना अटक करण्यात आली आहे. आणखी एक संशयित फरार असून, त्याचा शोध पोलीस घेत आहेत.
या घटनेची माहिती शहरात पसरताच घटनास्थळी शेकडो गोरक्षकांसह विविध हिंदू संघटनांचे पदाधिकारी दाखल झाले. दरम्यान, महापौर हिमगौरी आहेर-आडके यांनी घटनास्थळी भेट देऊन कत्तलखान्याची पाहणी केली. त्यानंतर पोलीस आणि प्रशासनाला पंचनामा करून अतिक्रमण असलेला कत्तलखाना पाडण्याचे आदेश दिले. त्यानुसार महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने अनधिकृतपणे सुरू असलेले दोन्ही कत्तलखाने जमीनदोस्त केले. सकाळी सुरू झालेली ही कारवाई दुपारी बारा वाजेपर्यंत सुरू होती.
यावेळी गोरक्षा दलाचे पुरुषोत्तम आव्हाड यांच्यासह कार्यकर्ते, मनपा गटनेते अॅड. श्याम बडोदे, नगरसेवक अजिंक्य साने, नगरसेविका सुप्रिया खोडे, डॉ. दीपाली कुलकर्णी, नगरसेवक बाळकृष्ण शिरसाठ, माजी नगरसेवक सुनील खोडे आणि विनायक गिते आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी हिंदू संघटनांच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत घटनेचा निषेध व्यक्त केला. या प्रकरणी नदीम हारून कुरेशी, मोसिन कुरेशी, रिझवान कुरेशी आणि रिक्षाचालक सलमान शेख यांच्याविरोधात इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील चार जणांना पोलिसांनी अटक केली असून, अन्य एक संशयित फरार असून, त्याचा शोध सुरू आहे.
आयुक्त हद्दीत गोमांस विक्रीस पूर्णत: बंदी असतानाही मुंबई महामार्गालगत असलेल्या राजीवनगर परिसरातील झोपडपट्टीत मुख्य रस्त्यावरच अनधिकृत कत्तलखाना उभारून गोवंशाची कत्तल करून त्याची उघडपणे विक्री होत असल्याची माहिती गोरक्षक आणि हिंदू संघटनांकडून पुढे आली आहे. याबाबत पोलीस आणि पालिका प्रशासनाला याची माहिती कशी मिळाली नाही, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.
यापूर्वी गोमांस विक्री वडाळागाव परिसरात होत असल्याच्या तक्रारीनंतर इंदिरानगर पोलिसांनी त्या भागात वेळोवेळी छापे टाकून विक्री केंद्रांवर कारवाई केली होती. त्यानंतरही पोलिसांना चकमा देत राजीवनगर येथे अनधिकृत कत्तलखाना सुरू करून गोमांस विक्री सुरू होती, अशी चर्चा आहे. या ठिकाणाहून शहरासह आसपासच्या लहान-मोठ्या गावांमधून ग्राहक गोमांस घेण्यासाठी येत असल्याची माहितीही पुढे येत आहे.
Raid on illegal slaughterhouse in Rajivnagar slum
पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…
मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…
आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…
स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…
धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…
पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…