नाशिक

येवला औद्योगिक वसाहतीत मूलभूत सोयी-सुविधा उपलब्ध करा : मंत्री भुजबळ

येवला : प्रतिनिधी
येवला औद्योगिक वसाहतीमध्ये मूलभूत सोयी-सुविधांची तत्परतेने उपलब्धता करावी, तसेच या सुविधा उपलब्ध करून देईपर्यंत उद्योजकांना विनाशुल्क मुदतवाढ द्यावी, असे निर्देश अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ यांनी दिले.
मुंबईत मंत्रालयात येवला औद्योगिक वसाहतीतील प्रश्नांबाबत आयोजित आढावा बैठकीत मंत्री भुजबळ यांनी संबंधितांना सूचित केले. या बैठकीस आमदार पंकज भुजबळ, माजी खासदार समीर भुजबळ, येवला नगरपरिषदेचे नगराध्यक्ष राजेंद्र लोणारी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती वसंत पवार यांच्यासह एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. वेलारासू यांच्यासह एमआयडीसीसह इतर संबंधित यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते
मंत्री भुजबळ यांनी सूचित केले की, येवला औद्योगिक विकासाच्या दृष्टीने या वसाहतीचा पूर्णक्षमतेने विकास करणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर या वसाहतीतील उद्योजकांना पाण्याची उपलब्धता तातडीने करून देण्यात यावी. यासाठीची आवश्यक कार्यवाही करत असतानाच याठिकाणी पाणीपुरवठ्याची कायमस्वरूपी व्यवस्था करण्यासाठी सुरू असलेल्या कामालाही गती द्यावी.
या वसाहतीतील विजेचा पुरवठा आणि रस्त्यांची सुविधा उपलब्ध करून देण्यास प्राधान्य द्यावे. या सर्व सुविधांची उभारणी होईपर्यंत याठिकाणी नोंदणी केलेल्या उद्योजकांना व्यवसाय उत्पादन सुरू करण्यासाठीच्या कालावधीला विनाशुल्क मुदतवाढ देण्यात यावी. या उद्योजकांच्या उद्योग बांधकामासाठी दोन वषार्ंचा कालावधी वाढवून द्यावा. त्यासोबतच या ठिकाणच्या मूलभूत सोयी-सुविधांची तातडीने कायमस्वरूपी उभारणी करण्यासाठी क्षेत्रीय स्तरावर संबंधित यंत्रणांनी बैठक घेऊन या कामाला गती देण्याच्या सूचना मंत्री भुजबळ यांनी यावेळी दिल्या.
येवला औद्योगिक वसाहतीतील भूखंडाचा प्रचलित दर जास्त असल्यामुळे याठिकाणी उद्योजक गुंतवणुकीसाठी आकृष्ट होत नाहीत. त्यामुळे या प्रचलित दरात किमान 50 टक्के सवलत द्यावी. याठिकाणी मोठा उद्योग येण्यासाठी प्रोत्साहन द्यावे, अशा सूचनाही भुजबळ यांनी केल्या. येवला औद्योगिक वसाहतीतील उद्योजकांच्या अडचणी समजून घेत यंत्रणांना त्या तत्परतेने सोडवण्याचेही मंत्री भुजबळ यांनी सूचित केले.

Provide basic amenities in Yeola Industrial Estate: Minister Bhujbal

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

11 hours ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

11 hours ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

11 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

11 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

12 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

12 hours ago