लॉजमालकास पोलिस कोठडी; पीडित महिलेची सुटका
लॉजमालकास पोलिस कोठडी; पीडित महिलेची सुटका
त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी
नाशिक- त्र्यंबकेश्वर रस्त्यावर तुपादेवी फाटा येथे असलेल्या बंजारा नावाच्या लॉजवरील वेश्या व्यवसायावर पोलिसांनी छापा टाकत एका पीडितेची सुटका केली व लॉजमालकास अटक केली.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी (दि. 14) पोलीस निरीक्षक महेश कुलकर्णी यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, तुपादेवी फाट्याजवळील बंजारा हॉटेल व लॉजिंग यामध्ये वेश्या व्यवसाय चालू आहे. अशी माहिती मिळाला. सहायक पोलिस निरीक्षक राजेश गावित, श्रेणी पोलिस उपनिरीक्षक सुभाष गिते, हवालदार मधुकर गावित, ब्राम्हणे, भोईर व पंच असे मिळालेल्या बातमीप्रमाणे शहानिशा करून एक बोगस गिर्हाईक तयार करून त्यास 500 रुपयांच्या दोन नोटा देऊन व त्यास पंचासमक्ष बंजारा हॉटेलवर पाठविले. तेव्हा बंजारा हॉटेलचा मालक विलास आहेर (रा. तळवाडे, ता. त्र्यंबकेश्वर) याने संबंधित ग्राहकास मागणीप्रमाणे एक महिला हॉटेलच्या एका रूममध्ये पाठवली. संबंधित ठिकाणी लागलीच ब्राम्हणे यांनी खात्री केली असता बोगस गिर्हाईक व त्याच्यासोबत हॉटेलमालकाने पाठविलेली महिलाही आत रूममध्ये मिळाली. याबाबत हॉटेलमालक विलास आहेर याच्याविरोधात त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. संबंधित गुन्ह्याचा तपास उपनिरीक्षक देवरे करीत आहेत. गुन्ह्यातील संशयितास यास सोमवारी (दि. 15) कोर्टासमोर हजर केले असता, त्यास चार दिवस पोलीस कोठडी सुनावली. पीडित महिलेस न्यायालयात हजर केले असता तिची महिला व बालकल्याण विभागाचे वात्सल्य आधार आश्रम, गंगापूर रोड येथे रवानगी केली. ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी पेठ विभाग वासुदेव देसले यांचे मार्गदर्शन व सूचनांप्रमाणे त्र्यंबकेश्वर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक महेश कुलकर्णी, सहाययक पोलिस निरीक्षक राजेश गावित, पोउनि राजेंद्र देवरे, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक सुभाष गिते, हवालदार मधुकर गावित, शिपाई नागरे, ब्राम्हणे, भोईर यांच्या पथकाने ही कारवाई केली.
Raid on prostitution business at Banjara Lodge
पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…
मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…
आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…
स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…
धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…
पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…