हवामान विभाग: चार -पाच दिवसात मुसळधार पावसाची शक्यता
पुणे : गेल्या काही दिवसांपासून उन्हाच्या तप्त झळा आणि घामाच्या धारांनी हैराण झालेल्या नागरिकांना लवकरच दिलासा मिळणार आहे . येत्या चार – पाच दिवसांत पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे . यामुळे उष्माघाताने त्रासलेल्या नागरिकांना तूर्तास तरी दिलासा मिळाणार आहे . यंदा मान्सून वेळेआधीच दाखल होणार आहे . अंदमानात मान्सून दाखल झाला आहे . तर २७ मे रोजी तो केरळात दाखल होण्याची शक्यता आहे . पुणे हवामान विभागाचे प्रमुख कृष्णानंद होसाळीकर यांनी ट्विट करत यासंबंधी माहिती दिली आहे . १७ ते २१ मेदरम्यान दक्षिण मध्य महाराष्ट्र , दक्षिण कोकण आणि मराठवाड्यात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे . त्याचवेळी उत्तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे .
२७ ला मान्सून केरळमध्ये
अंदमानच्या समुद्रात काल मान्सून दाखल झाल्याची माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिली आहे . नैर्ऋत्य मान्सून अंदमानच्या समुद्रात दाखल झाला आहे . सहा दिवस आधीच १६ मे रोजी मान्सून अंदमानच्या समुद्रात दाखल झाला आहे . २७ मे रोजी मान्सून केरळमध्ये दाखल होण्याचा अंदाज आहे . मात्र , त्याआधीच मान्सून दाखल होण्याची शक्यता अधिक वर्तवली जात आहे .
गाडीत पैसे असल्याच्या संशयावरून राडा साकोरा येथे गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांकडून सौम्य लाठी चार्ज नांदगांव /…
नाशिक : प्रतिनिधी नाशिक मध्यचे दोन्ही उमेदवार देवयानी फरांदे आणि वसंत गीते एकाच वेळी आल्याने…
नांदगाव: येथील मतदार संघात आज समीर भुजबळ आणि सुहास कांदे यांच्यात आज पुन्हा राडा झाला.…
नाशिक: लोकशाहीचा उत्सव असलेल्या मतदानास सकाळी 7 वाजेपासून सुरुवात झाली आहे, मतदानाचा हक्क बजावत अनेकांनी…
जिल्ह्यात पहिल्या दोन तासात ६. ८९ टक्के मतदान नाशिक मध्य मध्ये दोन तासात सर्वाधिक…
निफाड:- प्रतिनिधी निफाड विधानसभा मतदारसंघातील शिवसेना उ बा ठा चे उमेदवार माजी आमदार अनिल कदम…