नाशिक

येवला तालुक्यात वादळासह पावसाचा तडाखा

नगरसूल, हाडप सावरगाव, अंदरसूलला घरांची पडझड, विजेचे खांब कोसळले

येवला/नगरसूल : प्रतिनिधी
येवला तालुक्यात शनिवारी (दि.7) सायंकाळी सातला वादळासह जोरदार पावसाने हजेरी लावली. नगरसूल, हाडप सावरगाव, कुसमाडी, अंदरसूल भागात घराचे पत्रे उडाले. जनावरांचे शेड, विजेचे खांब, झाडे कोसळून नुकसान झाले. नगरसूलला घरांचे पत्रे उडाल्याने मुलीसह चार ते पाच जण जखमी झाले.
नगरसूल येथील पवार वस्तीवरील शरद पवार, किसन पवार यांच्या घरांचे पत्रे उडून शंभर ते दीडशे फुटांवर शेतात पडले. शरद पवार, पत्नी रत्नाबाई पवार व नात आराध्या बंड (वय 12) घरात असताना वार्‍यामुळे छत हलू लागले. शरद पवार यांनी छताला बांधलेली झोळी खाली ओढत असताना पत्रे उडाले. पत्नी व नात त्यांच्यावर विटांसह सिमेंटचा काही भाग पडल्याने आराध्या जखमी झाली. पीडित पवार कुटुंबीयांच्या नुकसानीचे मंडळाधिकारी लाडेकर यांनी पंचनामे केले. हाडप सावरगाव येथील योगेश घोडेस्वार, निवृत्ती घोडेस्वार, सीताराम घोडेस्वार, बबन कोल्हे यांच्या घरांचे छत उडून नुकसान झाले. भगवान काजळे यांच्या गोठ्याचे पत्रे उडाल्याने गायीच्या मानेला गंभीर जखम झाली.


येवला शिवसेना नेते संभाजीराजे पवार यांनी घटनास्थळी भेट देऊन प्रत्येक कुटुंबाचे सांत्वन करत शासकीय कर्मचारी व अधिकार्‍यांना संबंधित नुकसानीचे तत्काळ पंचनामे करून भरघोस मदत द्यावी, अशी मागणी केली. संभाजीराजे यांनी नुकसानग्रस्तांना प्रत्येकी 21 हजार रुपये मदत देण्याचे त्यांनी जाहीर केले. यावेळी नगरसूलचे माजी सरपंच सुभाष निकम, सुनील पैठणकर, अ‍ॅड. मंगेश जाधव, कांतिलाल साळवे, विकास निकम यांच्यासह नगरसूल तलाठी कार्यालयाचे सर्कल गणेश लाडेकर, कोतवाल गाडेकर व प्रमोद निकम आदी उपस्थित होते.

नुकसानभरपाईची मागणी
येवला तालुक्यात वादळी वार्‍यासह जोरदार पावसामुळे घरांची पडझड होऊन मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शेतीमालाचेदेखील नुकसान झाले आहे. महसूल विभागाच्या अधिकार्‍यांनी नुकसानीचे पंचनामे करून संबंधित व्यक्तींना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकर्‍यांनी बोलताना केली आहे.

 

 

Editorial Team

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

16 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

16 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

16 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

16 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

17 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

17 hours ago