तासभर धुव्वाधार; व्यावसायिकांचे हाल
नाशिक : प्रतिनिधी
दिवाळी अवघ्या काही दिवसावर आली असून, दिवाळीच्या तयारीला येग आला आहे. खरेदीसाठी नागरिकांची बाजारपेठेत गर्दी होत आहे.मात्र काल दुपारी अचानक झालेल्या पावसामुळे दिवाळी खरेदीवर पावसाचे विघ्न निर्माण झाले आहे.
दिवाळीमुळे बाजारपेठेत उत्साहात आहे. कोरोनाच्या दोन वर्षानंतर बाजारपेठेला झळाली पसरली आहे. निर्बंधमुक्त सण साजरा होत असल्याने नागरिकांमध्ये उत्साह आहे. तसेच मोठ मोठ्या कंपन्याचे बोनस झाल्याने कामगार वर्ग दिवाळीची खरेदी करण्यासाठी बाजारपेठेत गर्दी करत आहेत. त्याचप्रमाणे व्यावसायिकांनी बाजापेठेते दिवाळीसाठी लागणार्या कपडे ज्वेलरी, फराळी पदार्थ , दिवे, आकाश कंदील या साहित्यानी बाजारपेठा सजल्या आहेत. मात्र पावसामुळे रस्त्यालगत बसलेल्या व्यवसायिकांचे मात्र प्रचंड हाल झाले. अचानक पाऊस सुरू झाल्याने विक्रीसाठी ठेवलेले कपडे, साहित्य भिजल्याने व्यावसायिकांचे नुकसान झाले आहे. तसेच दुपारच्या सुमारास झालेल्या पावसामुळे आणि ढगाळ वातावरणामुळे अनेकांनी खरेदीला येणे टाळले तर जे नागरिक खरेदीसाठी आले होते त्यांची मात्र एैन वेळी आलेल्या पावसामुळे चांगलीच तारांबळ उडाली. नंतर पाऊस थांबला असला तरी पावसाचे पाणी साचले असल्याने नागरिकांना रस्त्यावरून वाट काढणे त्रासदायक जात होते.
पावसामुळे व्यावसायिकांचे हाल
काल दुपारी अचानक झालेल्या पावसामुळे नागरिकांसह व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले आहे. खरेदीसाठी गर्दी होत असताना दुपारच्या सुमारास झालेल्या पावसामुळे संध्यकाळी खरेदीसाठी येणार्यांचे प्रमाण कमी होते.
हेही वाचा : पाऊस काही थांबेना, खड्डे काही बुजेना!
रस्त्यावर खड्डे खड्डे
सतत होणार्या पावसामुळे रस्त्यावर खड्डेच खड्डे निर्माण झाल्याने वाहनधारकांना वाहन चालवणे कठीण जात आहेत. तर पादचार्यांना चालतांनाही अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
*छगन भुजबळ यांनी घेतले काळाराम मंदिरात दर्शन* नाशिक: प्रतिनिधी श्रीराम नवमीच्या निमित्ताने राज्याचे माजी उपमुख्यमंत्री…
कर्जमाफी देऊ नका आणि जखमेवर मीठही चोळू नका महायुतीतील भाजपा, शिवसेना (शिंदे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस…
नाशिक: प्रतिनिधी अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांची पाहणी केल्यानंतर शेतकऱ्यांविषयी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या कृषी मंत्री…
अंमली पदार्थ विकणार्यांशी कनेक्शन उघड सिडको : विशेष प्रतिनिधी नाशिक पोलीस दलात मोठा घोटाळा उघडकीस…
मुंबई: शोर, क्रांती, रोटी कपडा और मकान यासारख्या एकसे बढकर एक चित्रपटातून आपल्या अभिनयाचा ठसा…
गोदावरीचे गटारीकरण तात्काळ थांबवा गोदावरी जतन व संवर्धन संघर्ष समितीचे निवेदन नाशिक : प्रतिनिधी गोदावरीचे…