महाराष्ट्र

दिवाळी फराळाला महागाईच्या झळा

 

बजेट कोलमडले : नागरिकांचे निघणार दिवाळं

नाशिक : प्रतिनिधी

दिवाळी हा नवचैतन्याचा सण  आाहे.. दिवाळीच्या महिनाभर आधीपासून दिवाळीची तयारी करण्यात येते. अबालवृध्दापासून सगळ्यांनाच दिवाळीच्या सणाची उत्सुकता असते. दिवाळीत तयार केल्या जाणार्‍या फराळी पदार्थाची उत्सुकता असते. मात्र यंंदा दिवाळीतील फराळी पदार्थालाही महागाईचा फटका बसला आहे.

दिवाळी फराळासाठी लागणारे चकली, चिवडा ,लाडू, करंजी,शंकरपाळे  पदार्थ केेले जातात. मात्र किराणाच्या दरात वाढ झाल्याने तयार फराळी पदार्थाच्या किंमतीत वाढ झाली आहे. त्यामुळे दिवाळीचा खुमासदार फराळ खाण्यासाठी महागाईचा झळा नागरिकांना सहन कराव्या लागणार आहेत.

पूर्वी दिवाळी फराळ बनवण्यासाठी घरातील सर्व महिला वर्ग एकत्र येत तयारी करत असत. आणि हितगुज साधत दिवाळी फराळाचे पदार्थ बनवत असत. पण काळ बदलला तसा महिलांही नोकरी करत असल्याने त्यांना ड्यूटीमुळे फराळ घरी बनवणे शक्य होत नाही.   त्यामुळे गेल्या काही वर्षात तयार फराळी पदार्थांना मागणी वाढली आहे. तयार फराळी पदार्थांना  वाढलेली मागणी लक्षात घेत अनेक बचत गटांकडून घरगुती फराळ विक्रीसाठी ठेवला आहे. यंदाही घरगुतीपध्द्ीने बनवलेल्या फराळी पदार्थाना मागणी वाढली आहे.

 

तयार फराळी पदार्थ            1 कि. किंमत

चकली                             320

भाजके पोहे चिवडा              300

करंजी                             600

अनारसे                           600

बेेसन लाडू                        600

गोड शंकरपाळे                  350

तिखट शंकरपाळे                320

अनारसे पीठ                     220

हेही वाचा : शिधापत्रिकाधारकांना सरकारचं दिवाळी पॅकेज

 

Vaishali gosavi

यंदा खाद्यतेलाच्या किंमती वाढल्याने तयार फराळच्या किंमतीही      30 टक्कयांनी वाढल्या आहेत. किंमती वाढल्या असल्या तरी यंदा ग्राहकांची तयारी फराळी पदार्थांना मागणी अधिक आहे.

वैशाली गोसावी,( घरगुती फराळी पदार्थाचे व्यावसायिक    )

हेही वाचा : आरोग्यदायी दिवा

 

 

 

 

Ashvini Pande

अश्विनी पांडे या 2019 पासून पत्रकारितेत कार्यरत असून, सध्या दैनिक गांवकरीत ऑनलाइन कंटेंट क्रीएटर तसेच उपसंपादक म्हणून कार्यरत आहे. त्यांना राजकीय व सामाजिक, सांस्कृतिक विषयाचे सखोल ज्ञान असून, साहित्य संमेलन, राजकीय सभा, राजकारणातील घडामोडी या विषयावर त्यांनी विपुल लेखन केलेलं आहे. विज्ञान शाखे बरोबरच पत्रकारितेतील पदवी बरोबरच साहित्यातील पदव्यूत्तर पदवी त्यांनी प्राप्त केलेली आहे.पत्रकारितेतील योगदानाबद्दल त्यांना विविध सन्मानही प्राप्त झालेले आहेत.

Recent Posts

बापमाणूस

- ज्योती काळे-जाधव जगाने आईच्या मातृत्वाइतकाच पित्याच्या बिनशर्त त्यागाला महत्त्व दिले आहे का? बाप म्हणजे…

19 hours ago

का आकर्षिते ही जिंदगी?

- अनिल उदावंंत जीवनात काहीही आणि कितीही प्रतिकूल घडलं, तरी काही अपवाद वगळता कुणाही जीवाचं…

19 hours ago

श्रावणी शुक्रवार

- योगिनी पैठणकर श्रावणी शुक्रवार हा हिंदू पंचांगातील पवित्र सण आहे. मंगळागौर, श्रावणी शुक्रवार, कहाण्या,…

19 hours ago

अभ्यासाची आवड आणि करिअरची दिशा

महाविद्यालयीन जीवन हा प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा असतो. शालेय शिक्षणात अभ्यासक्रम, परीक्षा आणि…

20 hours ago

जेन-झी मानसिकता

बदलत्या काळाची नवी विचारसरणी आजच्या वेगाने बदलणार्‍या जगात प्रत्येक पिढीची विचार करण्याची, निर्णय घेण्याची आणि…

20 hours ago

मान्यता नाही, तरीही वर्ग सुरूच!

वावीतील ‘यूनिलेफ किड्स अकॅडमी’वर शिक्षण विभागाची कारवाई सिन्नर : प्रतिनिधी शाळेला मान्यता नाही, यू-डायस क्रमांक…

20 hours ago