राज्यात उद्यापासून मेघगर्जनेसह पाऊस

 

पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांचा प्रवास संथ गतीने सुरू असला तरी ते दोन – तीन दिवसांत केरळमध्ये दाखल होतील , असा अंदाज हवामान विभागाने कायम ठेवला आहे . मोसमी वाऱ्यांच्या प्रवासाच्या या काळामध्ये सोमवारपासून राज्यातील काही भागांत मेघगर्जना अणि सोसाट्याच्या वाऱ्यासह हलक्या पावसाची शक्यताही व्यक्त करण्यात आली आहे .

हेही वाचा : दिलासादायक:कोकण, मराठवाड्यात आनंदघन बसणार

मोसमी वाऱ्यांनी दक्षिण अरबी समुद्रात गेल्या दोन दिवसांपासून आगेकूच केली . या वाऱ्यांनी दक्षिण अरबी समुद्राचा बहुतांश भाग व्यापला असून , लक्षद्वीपपर्यंत मजल मारली आहे . श्रीलंकेचा अर्धा भाग व्यापून ते भारतभूमीच्या जवळ पोहोचले आहेत . मात्र , शनिवारी ( २८ मे ) मोसमी वाऱ्यांनी कोणतीही प्रगती केली नाही .

हेही वाचा : आज मान्सून अंदमानात दाखल

बंगालच्या उपसागरात दोन दिवसांपासून त्यांची प्रगती थांबली आहे . या वाऱ्यांच्या प्रवासासाठी पोषक वातावरण असून , ते पुढील काही तासांमध्ये पुन्हा प्रगती करतील आणि दोन – तीन दिवसांत केरळमधून भारतात प्रवेशतील , असा अंदाज हवामान विभागाने कायम ठेवला आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *