पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज पुण्यात गणेश क्रिडा संकुल येथे सकाळी दहा वाजता तोफ धडाडणार आहे. सभेत राज ठाकरे काय बोलणार याविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे. अचानक स्थगित करण्यात आलेला आयोध्या दौरा ,भोंग्याच्या आंदोलनावर मुख्यमंत्र्यांसह विरोधकांकडून जोरदार टीका करण्यात आली होती. विरोधकांच्या टिकेला काय उत्तर देणार हे पाहावे लागणार आहे.