कल्पना पांडे: प्रसंगी आंदोलनाचाही इशारा
नाशिक : प्रतिनिधी
स्मार्ट सिटी योजनेतंर्गत ऐतिहासिक रामसेतू पूल तोडण्याच्या हालचाली सुरू झाल्याने नागरिकांत संतापाचे वातावरण असून, हा पूल तोडण्याचा प्रयत्न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा राम सेतू बचाव अभियानाच्या कल्पना पांडे यांनी दिला आहे. काल घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी हा इशारा दिला.
रामसेतूमुळे नाशिक शहरातून पंचवटीत जाणे सोयीचे ठरते. स्मार्ट सिटी योजनेतंर्गत नारोशंकर मंदिराजवळील दोन सांडवे तोडण्यात आल्याने नागरिकांना ये-जा करण्यासाठी रामसेतूचा सहारा घ्यावा लागतो. रामसेतू जर तोडला तर नाशिक व पंचवटीतील नागरिकांना ये-जा करणे अडचणीचे ठरणार आहे. रामसेतू तोडण्याऐवजी गंगापूर धरणातील गाळ काढावा, गोदावरीचे कॉंक्रिटीकरण काढावे त्यामुळे नदीपात्र खोल होईल आणि नदीपात्रातील नैसर्गिक स्त्रोत खाली जाईल, पाणी जिरण्याचे प्रमाण वाढेल. रामसेतूजवळ असलेले स्मारके, गांधी स्मारक, कपूरथळा, पुरातन मंदिरे व वास्तू आजही महापुराचे दणके सहन करुनही दमदारपणे उभ्या आहेत. रामसेतू पुलाचे मजबुतीकरण व डागडुजी केल्यास तो ही ताठपणे उभा राहिल. ब्रिटिशांनी होळकर पुलाची गॅरंटी संपलेली आहे. असे घोषित केल्यावरही त्या पुलाला नाशिक मनपाने मजबुती व डागडुजी व सुशोभित केले आहे. त्यास आजपर्यंत काही झालेले नाही. नाशिक मनपा व स्मार्ट सिटीच्या वतीने रामसेतू पुलाची पाहणी करण्यात आली. पुलावरील दोन टप्याचा थर व छोटे होल व खड्डे भरुन व पुलाची डागडुजी करता येणे शक्य आहे. परंतु एवढा वेळ त्यांच्याजवळ वेळ असूनही नवीन स्लॅब टाकू शकले असते. तरी पण रामसेतू पुलावर सदरचे काम अधिकार्यांनी केलेले नाही. पुलाचा वापर बंद करण्याचा प्रयत्न स्मार्ट सिटी कंपनीचे अधिकारी करीत आहेत.
गोदाघाट, रामसेतू पूल हा अगोदरपासूनच असल्याने त्याचे चांगल्याप्रकारे सुशोभिकरण करणे गरजेचे आहे. फक्त जिथे गरज आहे. तेथे स्लॅब टाकून रामसेतू पूल मजबुत होणार आहे. आहे त्या स्थितीत रामसेतूचे मजबुतीकरण करावे, सुशोभीकरण करावे अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. या पत्रकार परिषदेला सुनील महंकाले, सतीश शुक्ल, रमेश निकम, राजेंद्र अदयप्रभू, संजय प्रयागे उपस्थित होते.
पुरुषोत्तम नाईक दि. 17 ते 23 ऑगस्ट 2025 मेष : सुखवार्ता कळतील या सप्ताहात रवी,…
मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय चेहरा, ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचे वयाच्या 68 व्या वर्षी…
देशभरातून आमंत्रणे; महाराष्ट्राच्या भक्तिभावाला नवी दिशा पंचवटी : प्रतिनिधी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा प्राण म्हणजे गणेशोत्सव.…
गिरीश महाजन यांच्या दाव्यानंतर भुजबळांचेही प्रत्युत्तर नाशिक : प्रतिनिधी नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद पुन्हा एकदा ऐरणीवर…
बोलठाण : प्रतिनिधी नांदगाव तालुक्यातील जातेगावपासून सात किलोमीटर अंतरावरील पिनाकेश्वर महादेव घाटात रविवारी (दि.17) सायंकाळी…
वीजचोरी रोखण्यास मदत; महावितरणाच्या वरिष्ठ अधिकार्यांना विश्वास निफाड : विशेष प्रतिनिधी विजेची हानी तथा गळती,…