नाशिक

हिरावाडीतील कोळीवाड्यात आगीचे तांडव

गॅस सिलिंडर स्फोटाने भडका; शॉर्टसर्किटमुळे आग

पंचवटी : प्रतिनिधी
हिरावाडीतील कॅनॉल रोडवरील कोळीवाड्यात मंगळवारी (दि. 24) सकाळी ट्रान्स्फॉर्मरच्या डीपीला लागून असलेल्या घरात शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. आगीने शेजारील घरांना वेढा घातल्यानंतर एका घरातील गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याने आगीने रौद्ररूप धारण केले. या दुर्घटनेत सहा घरे जळून खाक झाली आहेत. घरातील रोकड व संसारोपयोगी साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडले.
या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, स्थायी समिती सभापती मच्छिंद्र सानप, नगरसेवक गौरव गोवर्धने, जुई शिंदे आणि प्रियंका माने यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. आग आटोक्यात आणल्याने सुदैवाने जीवितहानी टळली.
हिरावाडीसमोरील कोळीवाडा हा दाट लोकवस्तीचा परिसर आहे. मंगळवारी सकाळी ट्रान्स्फॉर्मरच्या डीपीला लागून असलेल्या घरात अचानक आग लागली. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. सुरुवातीला दोन ते तीन घरांपर्यंत मर्यादित असलेली आग काही क्षणात वाढत गेली. आगीचे धुराचे लोट आणि ज्वाळा दिसताच परिसरातील नागरिकांनी घराबाहेर धाव घेत सुरक्षित ठिकाणी जाण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान, आगीच्या विळख्यात सापडलेल्या एका घरातील गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. या स्फोटामुळे आगीचा भडका उडाला आणि परिसरात एकच घबराट पसरली.
पाहता पाहता शांताबाई सखाराम जाधव, सुनीता अंबादास जाधव, आशा विलास मिरजकर, मिनाबाई संतोष मोरे, मोहन गोविंद धोत्रे, नर्मदबाई होनाजी इंगोले यांची घरे आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. आगीची तीव्रता वाढत असल्याने रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे केंद्रप्रमुख प्रदीप बोरसे, हर्षत पटेल, लीडिंग फायरमन विजय शिंदे, जवान नितीन मस्के, संदीप जाधव, ज्ञानेश्वर पाटील, हर्षद वाघ यांच्यासह 15 जवानांंनी आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले.

घटनेची माहिती मिळताच गौरवभाऊ यांनी आम्हाला भेट देऊन दहा हजार रुपयांची प्रत्येकी मदत केली. मात्र, आमचे जीवन उघड्यावर आले असून, प्रशासनातर्फे आमच्या राहण्याची सोय व पुनर्वसन व्हावे.
– सुनीता जाधव, पीडित महिला

आगीत ज्यांची घरे जळाली, ती सर्व कुटुंबे अत्यंत सामान्य आणि गरीब आहेत. आगीमुळे त्यांचा संसार उघड्यावर आला असून, मोठे नुकसान झाले आहे. प्रशासकीय स्तरावर मदत मिळत राहील मात्र, संकटाच्या काळात माणुसकीच्या भावनेतून या कुटुंबांना तातडीचा आधार मिळावा, यासाठी मदतीचा हात पुढे केला आहे. – गौरव गोवर्धने, नगरसेवक, प्रभाग क्रमांक 3

Rampage of fire in the Koliwada of Hirawadi

 

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

ऐका होऽऽ ऐका..

- वासवदत्ता अग्निहोत्री चित्रपटात, नाटकात, जुन्या कथांमधून आपण हे बर्‍याच वेळेस ऐकलेय. अधिकारीवर्ग, दवंडी पिटून…

4 hours ago

दिव्या दिव्या दीपत्कार…

- सुजाता येवले पूर्वीच्या काळातले दिवे लागण्याच्या कातरवेळेला वातावरण आणि मन शुभ पवित्र, ऊर्जाभारित बनवणारे,…

4 hours ago

वेदनेचा बाजार

- सीमाताई मराठे राज्यातील आरोग्य व्यवस्थेची लक्तरे वेशीवर टांगणारी आकडेवारी पुन्हा एकदा समोर आली आहे.…

5 hours ago

डोनाल्ड ट्रम्प-शी जिनपिंग भेट

सहकार्याच्या पडद्यामागे महासत्तांचा संघर्ष! - समाधान कदम जागतिक राजकारणात महासत्तांमधील संघर्षाचे स्वरूप काळानुसार बदलत गेले…

5 hours ago

निती आयोगाचे सल्ले

- राजेश शिरभाते राज्यातील विविध प्रकल्पांसाठी व ते सुरळीत कार्यान्वित होण्यासाठीचे अनेक महत्त्वाचे सल्ले काल…

5 hours ago

इगतपुरीत पंचवटी एक्स्प्रेसखाली येऊन मामा-भाचा गंभीर जखमी

भाच्याने गमावला पाय; मामाच्या हाताची बोटे तुटली इगतपुरी : प्रतिनिधी इगतपुरी रेल्वेस्थानकावर पंचवटी एक्स्प्रेसमधून प्रवास…

5 hours ago