नाशिक

राणेंना भराडीदेवी पावली!

सिंधुदुर्ग जि. प.वर भाजपची एकहाती सत्ता

सिंधुदुर्ग : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत भाजपने एकहाती सत्ता मिळवली आहे. मंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली भाजपने जिल्हा परिषदेत तब्बल 27 जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळवले असून, तळकोकणात ‘राणे ब्रँड’ची हवा पुन्हा एकदा कायम असल्याचे निकालातून स्पष्ट झाले आहे.
सोमवारी (दि.9) एकीकडे आंगणेवाडीतील श्री भराडी देवीचा वार्षिक जत्रोत्सव भक्तिमय वातावरणात सुरू असतानाच, दुसरीकडे जिल्ह्याच्या राजकारणाची दिशा ठरवणारा निवडणूक निकाल जाहीर झाला. या दुर्मीळ योगायोगामुळे राणेंना भराडी देवी पावली अशी भावना कार्यकर्त्यांत व्यक्त होत आहे. 50 सदस्यांच्या सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत भाजपने 27 जागा जिंकत स्पष्ट बहुमताचा टप्पा ओलांडला आहे. 100 जागांच्या पंचायत समिती निवडणुकीत भाजपने 60 जागा जिंकत वर्चस्व प्रस्थापित केले आहे. शिंदे गटाची शिवसेना 27 जागांसह दुसर्‍या क्रमांकावर आहे, तर ठाकरे गट केवळ 7 जागांवर समाधान मानताना दिसतो. विशेष म्हणजे, वैभववाडी पंचायत समितीत भाजपने सर्वच्या सर्व 6 जागा जिंकत ‘क्लीन स्वीप’ केला आहे.

 

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

सिंहस्थात स्वयंसेवी संस्थांचे योगदान

- डॉ. मुक्तेश्वर मुनशेट्टीवार भारताची अध्यात्मिक व धार्मिक परंपरा, संस्कृतीची विविधता आणि सामाजिक सलोखा यांचे…

18 hours ago

सिंहस्थानंतरही नाशिकच्या विकासाला चालना मिळणार : शेखर सिंह

- अश्विनी पांडे पार्किंग मार्चपर्यंत, प्रमुख महामार्गांची कामे मेअखेरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन सिंहस्थाच्या प्रत्येक कामासाठी…

18 hours ago

अफगाणिस्तानमधील 25 लाख मुली शिक्षणाविना!

ऑगस्ट 2021 रोजी तालिबानने काबूलवर कब्जा मिळवून अफगाणिस्तानची सत्ता हस्तगत केली होती. या घटनेला पाच…

18 hours ago

सुपर पॉवर सीएम

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणत्याही खात्याच्या मंत्र्याने घेतलेला निर्णय बदलण्याचा किंवा त्यात थेट हस्तक्षेप करण्याचा…

19 hours ago

शासकीय आश्रमशाळांमध्ये शिक्षकांच्या 2,421 पदांसाठी मेगाभरती

आदिवासी विकास विभाग : ‘पवित्र’ पोर्टलवरून शंभर टक्के पदे भरली जाणार नाशिक : प्रतिनिधी महाराष्ट्र…

19 hours ago

भूसंपादनावरून महासभा गाजली

पंचवीस वर्षांपासून शेतकर्‍यांवर अन्याय, नुकसान होणार नाही; आयुक्तांचे आश्वासन नाशिक : प्रतिनिधी सिंहस्थसाठी 2002 मध्ये…

19 hours ago