काम पूर्ण होण्यास लागणार सहा महिने
सिडको : विशेष प्रतिनिधी
राणेनगर परिसरातील रस्त्याचे रुंदीकरणाचे काम अखेर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून सुरू करण्यात आले आहे.
या रस्त्याच्या रुंदीकरणाची मागणी नागरिकांकडून गेल्या अनेक वर्षांपासून होत होती. ही मागणी मान्य करण्यात आल्याने समाधान व्यक्त होत असले, तरी काम सुरू झाल्यामुळे तात्पुरत्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
सध्या रुंदीकरणाच्या कामामुळे या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली असून, नागरिकांना जवळपास एक किलोमीटरचा वळसा घालून रस्ता ओलांडावा लागत आहे. या ठिकाणी ‘प्रवेश बंद’चे फलक लावण्यात आले आहेत. सुरक्षेसाठी काही कर्मचार्यांची नियुक्ती करण्यात आली असली, तरी वाहतूक सुरळीत राहावी यासाठी वाहतूक पोलिसांची कायमस्वरूपी नेमणूक व्हावी, अशी नागरिकांची मागणी आहे.
प्रशासनाकडून या कामास किती कालावधी लागणार आहे, याची ठोस माहिती देण्यात आलेली नाही. तसेच कामाच्या ठिकाणी किंवा परिसरात कालावधी, प्रगती आणि पर्यायी मार्ग यासंदर्भातील कोणतेही फलक लावलेले नाहीत. त्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम व नाराजी आहे.
विशेषतः शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थी, नोकरदार वर्ग, तसेच ज्येष्ठ नागरिक यांना यामुळे अधिक त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्याचे काम अत्यावश्यक असले तरी नियोजनाचा अभाव जाणवत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. प्रशासनाने कामाची सविस्तर माहिती प्रसारमाध्यमांद्वारे वेळोवेळी द्यावी, कामाचा कालावधी स्पष्ट करावा आणि पर्यायी मार्गांची माहिती फलकाद्वारे पुरवावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…
महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…
कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…
सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…
पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…
नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्या…